आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • With The Help Of Apps Jio Users Can Find Unknown Number's Operator, Will Save From The IUC Charge

जियो यूजर्स अॅप्सच्या मदतीने शोधा अननोन नंबरचा ऑपरेटर, IUC चार्जपासून वाचाल 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क : मुकेश अंबानी यांची कंपनी जियोच्या ग्राहकांना दुसऱ्या कंपनीच्या नेटवर्कवर कॉल केल्यावर आता 6 पैसे प्रति मिनिटे द्यावे लागणार आहेत. हा नियम 10 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आला आहे. म्हणजेच 10 ऑक्टोबरपासून जे जियो यूजर्स नवा रिचार्ज करतील त्यांना आययूसी टॉप-वर देखील घ्यावे लागेल. तेव्हाच एखाद्या दुसऱ्या नेटवर्कच्या नंबरवर कॉल करू शकतील. मात्र जियो टू जियो कॉलिंग पूर्णपणे फ्री असेल. अशात जर तुम्हाला एखाद्या अननोन नंबर किंवा एखाद्या अशा नंबरवर फोन करायचा असेल, ज्याच्या ऑपरेटरची माहिती नाहीये. तेव्हा आम्ही तुम्हाला त्या नंबरच्या ऑपरेटरला चेक करण्याची ट्रिक सांगत आहोत. 

ऑपरेटर चेक केल्याने काय फायदा होतो... 
जियोवरून जियो नंबरवर कॉलिंग पूर्णपणे फ्री आहे. म्हणजेच तुम्ही देशातील कोणत्याही जियो नंबरवर फ्री कॉलिंग करू शकता. यासाठी तुम्हाला आययूसी टॉप-अप घेण्याची गरज नाहीये. अशात जेव्हा तुम्हाला एखाद्या नंबरवर कॉल करण्यापूर्वीच त्या ऑपरेटरबद्दल माहित असेल तर तुम्ही कॉलचे पैसे वाचवू शकता. 

अशी माहिती काढा एखाद्या नंबरच्या ऑपरेटरची... 
यासाठी तुम्हाला आपल्या फोनमध्ये पेटीएम, फ्री रिचार्ज, फोन पे यांसारखे अॅप घ्यावे लागतील. येथे जेव्हा तुम्ही तुमचा फोन रिचार्जच्या ऑप्शनवर जाल आणि एखादा नंबर डायल कराल तेव्हा ते त्याच्या ऑपरेटरबद्दल सांगेल. म्हणजेच तुम्हाला त्या नंबरच्या ऑपरेटरबद्दल कळेल. तेव्हा त्यावर फोन करण्यापासुन तुम्ही वाचू शकता. 

जियोचा आययूसी टॉप-अप प्लॅन... 
- 10 रुपयांच्या टॉप-अप प्लॅनवर 124 IUC मिनिटे आणि 1GB डाटा मिळेल. 
- 20 रुपयांच्या टॉप-अप प्लॅनवर 249 IUC मिनिटे आणि 2GB डाटा मिळेल.
- 50 रुपयांच्या  टॉप-अप प्लॅनवर 656 IUC मिनिटे आणि 5GB डाटा मिळेल.
- 100 रुपयांच्या टॉप-अप प्लॅनवर 1362 IUC मिनिटे आणि 10GB डाटा मिळेल.

बातम्या आणखी आहेत...