आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञानाच्या मदतीने रेल्वे नियंत्रण कक्षाला मिळणार रूळ तुटल्याची माहिती

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी उत्तर मध्य रेल्वेचा पुढाकार
  • सध्या गतिमान, राजधानी, शताब्दी रेल्वेत लावले आहेत व्हील इम्पॅक्ट लोड डिटेक्टर यंत्र

शेखर घोष

नवी दिल्ली - रेल्वे प्रवास सुरक्षित करण्यासाठी रेल्वेने काही प्रीमियम रेल्वे गाड्यांना नव्या तंत्रज्ञानाने सज्ज केले आहे. जलदगती गाड्यांच्या चाकांमधील ब्रेक बायंडिंगद्वारे रूळ तुटल्याची माहिती मिळवण्यासाठी देशात पहिल्यांदाच एनसीआर रेल्वेने व्हील इम्पॅक्ट लोड डिटेक्टर यंत्र लावली आहेत. सध्या गतिमान, राजधानी, शताब्दीसारख्या गाड्यांच्या चाकांमध्ये व्हील इम्पॅक्ट लोड डिटेक्टर यंत्र लावण्यात आले आहे.तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये - या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्ये म्हणजे प्रवासात चाकांच्या दाबामुळे ब्रेक बायडिंगने रूळ तुटल्यास ते नियंत्रण कक्षात अलार्म वाजवेल. एवढेच नव्हे तर रूळ सरकला, तुटल्यास हे यंत्र नियंत्रण कक्षात अलार्म बरोबर संदेशही पाठवेल. या यंत्रणेत रूळ तुटण्याची वेळ, जागेची माहिती मिळेल. यामुळे नियंत्रण कक्षात तैनात अधिकारी लगेच रुळावरुन येणारी रेल्वे थांबवून रुळाची दुरुस्ती केली जाईल आणि यामुळे एखादा मोठा अपघात टाळता येईल.लवकरच इतर जलदगती रेल्वेंमध्येही वापरले जाईल हे तंत्रज्ञान


रेल्वे मंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गतिमान एक्स्प्रेस, शताब्दी आणि राजधानी एक्स्प्रेस गाड्यांच्या ऑनलाइन मॉनिटरिंगसाठी बायल्ड आणि एचएसडब्ल्यू दोन्ही प्रकारच्या तंत्राचा वापर करण्यात येत आहे. हे यंत्र रेल्वे गाडीच्या चाकांमध्ये लावलेल्या बेअरिंगचा आवाज ओळखते. चाकांच्या बेअरिंगमध्ये बिघाड झाल्यास आवाज बदलेल. हा आवाज रेकॉर्ड करुन संदेशाच्या रुपाने रेल्वेच्या चाकांमध्ये लावलेले यंत्र नियंत्रण कक्षाला संदेश पाठवेल. परिणाम चांगला राहिल्यास हमसफर, दुरंतोसह इतर जलदगती रेल्वेंमध्येही ते लावले जाईल.बातम्या आणखी आहेत...