आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - दिल्लीत निवडणूक प्रचार गुुरुवारी थंडावला. आता नेते घरोघर जाऊन मतदारांशी संपर्क साधतील. ८ फेब्रुवारी रोजी मतदान होईल. निवडणुकीची अधिसूचना १४ जानेवारीला जारी झाली होती. या २३ दिवसांत भाजप, आम आदमी पार्टी व काँग्रेसने प्रचारातून आपले शक्तीप्रदर्शन केले.
भाजपने देशभरातील १०० दिग्गजांना प्रचारात उतरवले. गृहमंत्री अमित शहा यांनी अधिसूचनेच्या २५ दिवस आधीच भारत वंदना उद्यानाच्या उद्घाटनाने प्रचार मोहिमेचा प्रारंभ केला होता. त्यानंतर प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात जनसंपर्क करत राहिले. त्यांनी सभाही घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन सभा घेतल्या. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तीन मोठे रोड-शो केले. त्याशिवाय दररोज लहान-सहान सभाही घेतल्या. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रकृतीच्या कारणास्तव सभा घेतली नाही. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात माजी अध्यक्ष राहुल गांधी व सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी प्रत्येकी चार सभा घेतल्या.
पक्षाचा चेहरा: आपकडे केजरीवाल, भाजप, काँग्रेसची नेतृत्वावर मदार
स्टार प्रचारक : आपकडे केवळ ६, काँग्रेसजवळ ४०, मैदानात कमी
शेवटचा टप्पा: भाजप मोठ्या नेत्यांच्या सभा
भाजपचे दाेन्ही सभागृहातील ३७० खासदार दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय होतील, असे पक्षाच्या सूत्रांनी स्पष्ट केले होते. संसदेच्या कामकाजानंतर उशिरा रात्री वेगवेगळ्या भागात जाऊन भाजपसाठी ते मत मागतील. हा भाजपच्या नुक्कड सभांचा एक भाग असेल. भाजपने दररोज नुक्कड सभा घेतल्या. त्याआधी पक्षाने ९ केंद्रीय मंत्री, ३५ पदाधिकारी, ६ मुख्यमंत्री, ३ माजी मुख्यमंत्री, ८ खासदार, ३८ माजी मंत्री-खासदारांना प्रचारात उतरवले. काँग्रेसच्या केवळ तीन मुख्यमंत्र्यांनी प्रचार केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.