• Home
  • Bollywood
  • News
  • Within a few hours we needed to get married to go to London and we became Mr. and Mrs. Bachchan!

व्हॅलेन्टाईन डे / लंडनला जाण्याच्या घाईमुळे काही तासांतच लावून दिले लग्न आणि आम्ही बनलो मिस्टर अँड मिसेस बच्चन!

जया बच्चनसोबतच्या प्रेमळ नात्याची कहाणी वाचा अमिताभ यांच्याच शब्दांत

दिव्य मराठी वेब टीम

Feb 14,2020 11:39:00 AM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : जयाजींसोबत माझे लग्न पक्के झाले तेव्हा मी पीडी स्कीम सोसायटीतील सातव्या नंबरच्या रस्त्यावरील 'मंगल' या भाड्याच्या घरात राहत होतो. आमचे लग्न फार थाटामाटात नव्हे तर अगदी साध्या पद्धतीने झाले होते. केवळ दोन कुटुंबे एकत्र आली आणि लग्न सोहळा पार पडला. यानंतर आम्ही दोघे लंडनला रवाना झालो. ही केवळ माझी एकट्याचीच पहिली लंडनवारी नव्हती, तर जयादेखील आयुष्यात पहिल्यांदाच लंडनला जात होत्या. यापूर्वी आमचा चित्रपट जंजीर खूप लोकप्रिय ठरला. यादरम्यान हा चित्रपट यशस्वी ठरला तर सर्व मित्रांनी लंडनला जाऊन सुट्यांचा आनंद घ्यायचा, असे आमच्या मित्रांच्या ग्रुपने ठरवले. आम्ही सर्वजण लंडनला जाणार असल्याची माहिती आणि त्याची परवानगी घेण्यासाठी मी बाबुजींकडे गेलो. त्यांनी त्याच वेळी प्रश्न उपस्थित केला, 'तुमच्यासोबत आणखी कोण-कोण जात आहे?' त्यानंतर मी त्यांना जाणाऱ्यांची यादी वाचून दाखवली.

त्यांनी प्रतिप्रश्न केला- 'तुमच्यासोबत जयादेखील जात आहे? तुम्ही दोघेच तिकडे जात आहात?'

मी उत्तर दिले- 'हो'

ते म्हणाले- 'जर तुम्ही दोघे सोबत लंडनला जाऊ इच्छित असाल तर आधी लग्न करा, मग तिकडे जा.'

माझ्या तोंडातून निघाले - 'ओके'


त्याच वेळी दोन्ही कुटुंबीयांना आणि पंडितजींना कळवले. पुढच्या दिवशी घाई घाईत सर्व व्यवस्था करण्यात आली. लग्नाच्या दिवशी रात्रीच आमची लंडनची फ्लाइट होती. फ्लाइटच्या वेळेपूर्वीच लग्नाचे सर्व विधी पार पाडायचे होते. मालाबार हिल हे लग्नस्थळ निश्चित केले होते. तिथे जयाच्या मैत्रिणी राहत होत्या आणि तिथेच सर्व विधी पार पाडायचे होते. मी आपल्या लग्नाचा पारंपरिक भारतीय पोशाख घालून तयार झालो. तिथे जाण्यासाठी आपल्या कारच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलो आणि स्वत:च गाडी चालवत जाण्याची तयारी करायला लागलो. हे पाहून माझा ड्रायव्हर नागेशने मला ड्रायव्हिंग सीटवरून ओढले आणि म्हणाला- 'लग्न स्थळापर्यंत मीच तुम्हाला गाडी चालवून घेऊन जाईल.' अशा प्रकारे ती गाडीच आमच्यासाठी नवरदेवाच्या वरातीमध्ये चालणाऱ्या घोड्याचा पर्याय ठरली.


आम्ही लग्न स्थळाकडे रवाना होणारच होतो की तितक्यात पाऊस सुरू झाला. हे पाहून आमच्या आसपासचे लोक माझ्याकडे वेगाने धावत आले आणि म्हणाले- 'पाऊस शुभ आहे, आता लवकर निघा.' तेव्हा कुठे आम्ही तेथून निघालो. काही तासांतच आमचा लग्नसोहळा पार पडला.

X