आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक ध्रुवीकरण केल्याशिवाय भाजप विजयी होतच नाही : पृथ्वीराज चव्हाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला  - धार्मिक ध्रुवीकरण केल्याशिवाय भाजपचा विजय हाेतच नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. समाजात तेढ निर्माण केल्याशिवाय भाजपला निवडणूक जिंकता येत नाही. सध्या समतावादी पक्ष एकत्र येत अाहे. युपीए सरकारवर खाेटे अाराेप केले. मात्र नंतरच्या भाजप सरकारने एकही पुरावा कथित भ्रष्टाचाराबाबत सादर केला नाही असेही चव्हाण म्हणाले. तसेच कांॅग्रेसने संविधानानुसार समतेचे राज्य प्रस्थापित केले हाेते. मात्र भाजप सरकारकडून मनुवादाला खतपाणी घालण्यात येत असल्याचा अाराेप प्रदेशाध्यक्ष खा. अशाेक चव्हाण यांनी केला. दाेघेही कांॅग्रेस संघर्ष यात्रेअंतर्गत शुक्रवारी स्वराज्य भवनच्या मैदानात झालेल्या सभेत बाेलत हाेते.

 

अाज डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांचे तत्त्वज्ञान बाजूला ठेवण्यात येत अाहे. कांॅग्रेसची बांधिलकी वैचारिक हाेती. वंचितांना मुख्य प्रवाहात अाणावे, हे धाेरण कांॅग्रेसचे हाेते, असेही खा. चव्हाण म्हणाले. साजिद खान पठाण यांनी महापालिकेतील विविध प्रश्नांवर अावाज उठवला, असा उल्लेखही यांनी केला. प्रास्तविक महानगराध्यक्ष बबनराव चाैधरी यांनी केले. 

 

मतभेद िवसरा : कांॅग्रेसमधील जिल्ह्यातील गटबाजीवरही प्रदेशाध्यक्ष खा. चव्हाण यांनी भाष्य केले. मतभेद िवसरा आणि कामाला लागा. असे केल्यास अकोल्यात कांॅग्रेस उमेदवार निवडून येतील, असा विश्वास खा. चव्हाण यांनी व्यक्त केला. माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांनीही अकोल्यात नेते, कार्यकर्ते अाहेत असे म्हणत तरीही डिलिव्हरी का हाेत नाही, असा सवाल केला आणि नंतर एकच हशा पिकला. सभेतील मंचावरील नेत्यांनी खऱ्या अर्थाने एकत्र अाल्यास कांॅग्रेसचा िवजय हाेईल, असेही ते म्हणाले. 

 

भाजपला केवळ ३१ टक्के मतं : समाजात तेढ निर्माण केल्याशिवाय भाजपला निवडणूक जिंकता येत नाही, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. सन २०१४मध्ये भाजपला केवळ ३१ टक्केच मते मिळाली हाेती. देशातील विविध पाेटनिवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला. सर्वच पातळ्यांवर भाजप सरकार सपशेल अपयशी ठरले असून, याला मतपेटीतून उत्तर द्या, असे अावाहनही चव्हाण यांनी केले. 

 

यात्रा पातूरवरुन थेट बाळापूरला

जनसंघर्ष यात्रा अकाेल्यात न येता पातूरवरुन थेट बाळापूरकडे रवाना झाली. पूर्वनियाेजनानुसार वाशीम जिल्ह्यातून येणारी यात्रा अकाेला शहरात येणार हाेती. त्यानुसार नियोजनही करण्यात अाले हाेते. 

 

अन रिकाम्या खुर्चींची संख्या वाढतच गेली 

सभेच्या सुरुवातीला सभा मंडपात गर्दी कमी हाेती. मात्र काही वेळाने सभा मंडप संपूर्ण भरला. मंडपाबाहेर स्वराज्य भवन मैदनातही नागरिक उभे हाेते. प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांचे भाषण सुरु असताना प्रचंड गर्दी हाेती. मात्र नंतर वसंत पुरके, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतरही नेत्यांच्या भाषणाच्या वेळी गर्दी कमी हाेत गेली. रिकाम्या खुर्च्या नजरेत भरत हाेत्या. 

 

अखेर डाॅ. अभय पाटील झाले काँग्रेसवासी :

सभेत अनेकांनी कांॅग्रेसमध्ये प्रवेश केला. यात प्रामुख्याने डाॅ. अभय पाटील यांचा समावेश हाेता. डाॅ. पाटील यांनी यापूर्वी राष्ट्रवादी कांॅग्रेसचे नेते शरद पवार यांचीही भेट घेतली हाेती. ते राष्ट्रवादी कांॅग्रसेच्या अनेक कार्यक्रमांमध्ये उपस्थितही हाेते. त्यामुळे ते नेमके काेणत्या पक्षात प्रवेश घेतात, याबाबत चर्चा सुरु हाेती. अखेर शुक्रवारी या चर्चांना पूर्णविराम िमळाला. सभेत शकुर खान लाेधी, नदीम खान, यांच्यासह अनेकांनी कांॅग्रेसमध्ये प्रवेश केला. 

बातम्या आणखी आहेत...