आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधिमंडळ सचिवालयाचा कारभार सचिवांविना; अधिकाऱ्यांची पदे रिक्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : विधिमंडळाला लोकशाहीचे मंदिर म्हटले जाते. पण, राज्याच्या विधिमंडळातील प्रधान सचिव ते उपसचिव अशा चार दर्जाची पदे अनेक वर्षापासून रिक्त अाहेत. सेवानिवृत्तांना बढती देऊनच विधिमंडळाचे कामकाज रेटण्याचा प्रयत्न सुरू अाहे.


प्रधान सचिव अनंत कळसे जून २०१८ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांना दोनवेळा बढती देण्यात आली होती. सध्या हे क्रमांक एकचे पद रिक्त आहे. यू. के. चव्हाण हे सचिव दर्जाचे अधिकारी सप्टेंबर २०१७ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांना नोव्हेंबर २०१७ आणि २०१८ अशी दोन वर्षे कंत्राटी पद्धतीने घेतले. सध्या त्यांना सचिव इनप्लॅनमेंट म्हणून बढती देण्यात आली आहे.


सहसचिव क्रमांक एकचे अधिकारी मे २०१८ रोजीच सेवानिवृत्त झाले. या पदावरच्या अशोक मोहिते यांना ६ महिन्यासाठी करारपद्धतीने नेमणूक देण्यात आली होती. सध्या हे पद रिक्त आहे. सहसचिव क्रमांक दोनचे अधिकारी एम. एम. काज आॅगस्ट २०१७ रोजी निवृत्त झाले आहेत. त्यांना सभापतींचे सचिव म्हणून नेमण्यात आले आहे. विधिमंडळासाठी एकूण कर्मचारी पदे ८५० मंजूर आहेत. प्रत्यक्षात ७०० कर्मचारी कामावर आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्याबराेबरच लिपिक, भाषांतरकार, टंकलेखक, प्रतिनिवेदक अशी अनेक पदे अनेक वर्षापासून भरलेली नाहीत. जे अधिकारी कर्तव्यावर आहेत, त्यांच्या बढत्या, पदव्या आणि जात पडताळणी प्रमाणपत्रांना सचिवालयातील कनिष्ठ अधिकाऱ्यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याबाबतचे दावे प्रलंबित असल्याने अनेकांच्या बढत्या रखडल्या आहेत. निवृती झालेल्यांना कंत्राटी पद्धतीने नेमणूक दिली गेल्याने ज्यांना बढती मिळणार होती, त्यांना मिळाली नाही.

विधिमंडळाचे महत्त्व : सचिवालयाचे काम वर्षभर
१. विधिमंडळाचे संचलन विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष हे पीठासन अधिकारी करत असतात. २०१५ पासून सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक -निंबाळकर तर विधानसभा अध्यक्षपदी २०१४ पासून भाजपचे हरिभाऊ बागडे आहेत.
३. विधिमंडळाची वर्षातून तीन अधिवेशन भरवली जातात. मात्र अधिवेशनाच्या तयारीचे काम सचिवालयात वर्षभर चालू असते.
सलग अाठ वर्षे मुदतवाढीचा 'बाेनस'
निवृत्तीजवळ आलेल्या अधिकाऱ्यांना नियम माेडून परदेश दौऱ्यावर पाठवणे, सेवानिवृत्ती दिवशीच करारपद्धतीने नेमणूक देणे, आहे त्या पगारावर मुदतवाढी देणे असे अनेक प्रकार विधिमंडळात झाले आहेत. आश्चर्य म्हणजे एका अधिकाऱ्यास तर सलग ८ वर्षे मुदतवाढ देऊन सेवेत ठेवले आहे.
२. सरकार बनवणे, सरकारला योग्य प्रकारे वागायला लावणे, प्रसंगी सरकार बदलणे, सरकारी कामकाजावर देखरेख, सरकारी कामकाजात गैरकारभाराचा जाब विचारणे इत्यादी कामे विधिमंडळात होत असतात.
 

बातम्या आणखी आहेत...