आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-वडिलांपासून ते सगळ्या साक्षिदारांनी कोर्टात साक्ष फिरवली, पण 6 वर्षांच्या मुलीने आपल्या शब्दावर कायम राहून आरोपीला तुरूंगात पाठवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत(गुजरात)- लिंबायतमध्ये राहणाऱ्या चिमुकलीवर अडीच वर्षांपूर्वी बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला होता. तक्रार दाखल झाली आणि कोर्टात केस दाखल झाली. चिमुकलीच्या आई-वडिलांसहित सगळ्या साक्षिदारांनी कोर्टात आपली साक्ष फिरवली. सगळे म्हणाले की, अशी घटना घडलीच नाही. पण छोट्याश्या मुलीने हिम्मत दाखवून आरोपीला कोर्टात ओळखले. चिमुकलीच्या साक्षीनेच आरोपीला कोर्टाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली. 
 

लिंबायतच्या हनुमान शेरी राहणाऱ्या तक्रारदाराचा पती 15 ऑक्टोबर 2016 ला कामावर गेला होता. मुलगा आणि मुलगा जवळच असलेल्या अंगणवाडीत गेले होते. दुपारी जेव्हा पती आला तेव्हा त्यांची आई मुलांना घेण्यासाठी अंगणवाडीत गेली होती. घरी येत असताना आई परिसरातील मैत्रिणीच्या घरी गेले आणि मुले आरोपी किशोरच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी थांबले. काही वेळेनंतर मुलगा आईकडे गेला तेव्हा आईने विचारले, तुझी बहिण कुठे आहे. मुलगा म्हणाला, काकाने मला बाहेर काढले आणि दार आतून लावून घेतले. तत्काळ आईने तेथे जाऊन दार वाजवले, मुलीला विचारल्यावर तिने सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली.


सगळ्यांनी साक्ष फिरवली
पोलिसांसमोर ज्या साक्षिदारांनी साक्ष दिली होती, त्यांनी कोर्टात साक्ष बदलली. इतकच काय तर आई-वडिलांनीदेखील साक्ष बदलली, पण चिमुकलीने साक्ष देऊन आरोपीला तुरूंगात टाकले.

बातम्या आणखी आहेत...