आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 वर्षांपासून लाइमलाइटपासून दूर आहेत धर्मेंद्र यांच्या मुली, तर तिसरी पीढी पदार्पणासाठी आहे सज्ज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. गतकाळातील प्रसिध्द अभिनेते धर्मेंद्र यांचा आज वाढदिवस आहे. 8 डिसेंबर 1935 रोजी लुधियाना येथे जन्मलेले धर्मेंद्र यांनी वयाची 83 वर्षे पूर्ण केली आहेत. धर्मेंद्र गेल्या 57 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहे. त्यांनी 1960 साली त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्यांच्यानंतर त्यांचा थोरला मुलगा सनी देओल याने सिनेसृष्टीवर राज्य केले. सनीनंतर एन्ट्री झाली ती बॉबी देओलची. पण दुर्दैवाने बॉबीचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरले नाही.


सनी आणि बॉबी हे धर्मेंद्र आणि त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांची मुले आहेत. त्यांची दुसरी पत्नी आहे हेमामालिनी. धर्मेंद्र आणि हेमा यांची कन्या ईशा देओल हिनेदेखील सिनेसृष्टीत नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला खरा, पण तिलासुद्धा यश मिळू शकले नाही. धर्मेंद्र यांनी तिसरी पिढी बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. सनी देओलचा मुलगा करण देओल बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय.


प्रकाश कौर, सनी देओल, बॉबी देओल, करण देओल, हेमा मालिनी, ईशा देओल, अहाना देओल, धर्मेंद्र यांच्या या फॅमिली मेंबर्सविषयी तुम्ही बरेच काही ऐकले असले. पण या कुटुंबातील दोन व्यक्ती अशा आहेत, ज्यांचा एवढ्या वर्षांत कुठेही उल्लेख झाला नाही. या दोन व्यक्ती आहेत, धर्मेंद्र यांच्या मुली आणि सनी-बॉबीच्या बहिणी अजिता आणि विजेता देओल.


अजिता आणि विजेता या धर्मेंद्र आणि त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांच्या मुली आहेत. तर सनी आणि बॉबीदेखील यांचीच मुले आहेत. पण सनी आणि बॉबीप्रमाणे अजिता-विजेता कधीच कॅमे-यासमोर आल्या नाहीत. इंटरनेटवर दोघींची बालपणीची छायाचित्रे उपलब्ध आहेत. त्या दोघीही कायमच लाइमलाइटपासून दूर राहिल्या. फॅमिली फंक्शनमध्येही त्या कधीच दिसल्या नाहीत. 

 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोघीही बहिणी कॅलिफोर्निया येथे शिफ्ट झाल्या आहेत. इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, अजिताचे लग्न किरण चौधरी नावाच्या व्यक्तीसोबत झाले आहे. किरण चौधरी “1000 Decorative Designs from India” या पुस्तकाचे लेखक आहेत. अजिता पतीसोबत कॅलिफोर्निया येथा वास्तव्याला आहेत. अजिता यांचे निक नेम लल्ली आहे. 

 

धर्मेंद्र यांनी विजेता यांचे नाव त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसला दिले आहे. 'विजेता प्रॉडक्‍शन प्रायव्हेट लिमिटेड' असे धर्मेंद्र यांच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव आहे. विजेता यांच्या लग्नाविषयीची

कुठलीही माहिती इंटरनेटवर उपलब्ध नाहीते..

 

अजिता आणि विजेता या ईशा आणि अहाना देओल यांच्या सावत्र बहिणी आहेत. एकीकडे ईशा-अहाना नेहमीच लाइमलाइटमध्ये असतात. तर दुसरीकडे अजिता आणि  विजेता कधीही कॅमे-यासमोर आल्या नाहीत. 

 

धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीसोबत लग्न थाटल्यानंतर देओल कुटुंबीयांचे दोन भाग झालेत. एकीकडेच धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी त्यांच्या चारही मुलांसोबत वेगळ्या राहू लागल्या. तर दुसरीकडे धर्मेंद्र यांनी हेमा यांच्यासोबत नवीन संसार थाटला.  

 

ईशा आणि अहाना देओल यांच्या लग्नात प्रकाश कौर आणि त्यांची चारही मुले सहभागी झाली नव्हती. पण सनी देओलचा चुलत भाऊ अभय देओल लग्नात भावाच्या विधी पूर्ण करताना दिसला होता.  

 

वयाच्या 19 व्या वर्षी झाले होते धर्मेंद्र यांचे पहिले लग्न..
धर्मेंद्र यांचे पहिले लग्न वयाच्या 19 व्या वर्षी झाले होते. प्रकाश कौर हे त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव आहे. पहिले लग्न झाले असतानादेखील धर्मेंद्र यांनी बॉलिवूडची ड्रीमगर्ल हेमा मालिनीबरोबर आपला दुसरा संसार थाटला. धर्मेंद्र यांनी हेमा यांच्यासोबत दुसरे लग्न थाटले, त्यावेळी हेमा हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री होत्या. धर्मेंद्र आणि हेमा यांनी लग्नापूर्वी एक डझनहून अधिक सिनेमांमध्ये एकत्र काम केले. विवाहित आणि चार मुलांचे वडील असूनदेखील धर्मेंद्र यांनी हेमा यांच्या प्रेमाखातर सगळी बंधनं झुगारुन टाकली होती. त्यांनी धर्म परिवर्तन करुन हेमा यांच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे त्याकाळात धर्मेंद्र यांच्या एका मुलीचे लग्न झाले होते, तर थोरला मुलगा सनी सिनेसृष्टीत पदार्पणाची तयारी करत होता.

 

पहिल्याच भेटीत हेमाच्या पडले प्रेमात... 
 धर्मेंद्रे-हेमा यांची पहिली भेट ख्वाजा अहमद अब्बास यांच्या 'आसमान महल' सिनेमाच्या प्रीमिअरवेळी झाली होती. हेमा त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये नवोदित अभिनेत्री होत्या. त्यावेळी हेमा यांनी 'सपनो के सौदागर' हा एकच फ्लॉप सिनेमा केला होता. मात्र धर्मेंद्र बॉलिवूडचे सुपरस्टार होते. यावेळी पहिल्याच भेटीत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. 


धर्मेंद्र-हेमा यांचे लग्न खूप साध्या पध्दतीने झाले. धर्मेंद्र यांनी ना वरात आणली ना घोड्यावर बसून आले. परंतु हेमा यांच्या बंगल्यात कर्नाटक संगीत वाजत होते. दोघांचे लग्न पूर्ण विधीनुसार पार पडले. 

 

लग्नात जे पाहूणे आले होते त्यांना केळीच्या पानावर जेवण वाढण्यात आले होते. पाहूण्यांना उपमा, सांबर आणि भाताची मेजवानी होती. धर्म बदलून हेमा-धर्मेंद्र यांचे लग्न झाले होते. 
 
पुढे बघा, धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांचे Rare Photos...

बातम्या आणखी आहेत...