आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपीला भेटण्यास आलेल्या बहिणीला पोलिसांची मारहाण, भेटण्यासाठी पैसे मागितल्याचा पोलिसावर आरोप

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • जिल्हा रुग्णालयातील प्रिझनर वार्ड सध्या गुन्हेगारांसाठी वेलनेस सेंटर ठरत आहे

नाशिक- जिल्हा रुग्णालयाच्या प्रिझनर वॉर्डमध्ये आरोपीला भेटण्यास आलेल्या बहिणीकडे पैशांची मागणी करत तिला शिविगाळ आणि मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि. १) घडला. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनुसार प्रिझनर वार्ड कर्मचाऱ्याच्या विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप भाबड असे या संशयित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

गुन्हेगारांसाठी वेलनेस सेंटर

जिल्हा रुग्णालयातील प्रिझनर वार्ड सध्या गुन्हेगारांसाठी वेलनेस सेंटर ठरत आहे. विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयात महत्वाची जबाबदारी असलेले डाॅक्टर आणि गार्ड ड्युटीवरील पोलिस कर्मचाऱ्यांच्या संगनमताने येथे धडधाकट गुन्हेगारांना ‘आजारी’ असल्याचे दाखवत ताजेतवाने होण्यासाठी भरती केले जात असल्याची माहिती खुद्द पोलिस सूत्रांनी दिली.

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, या महिलेचा भाऊ एका गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याला पोटाचा अल्सर सल्याने त्यास जिल्हा रुग्णालयातील प्रिझनर वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. पीडिता पुणे येथून नाशिकला भावाला भेटण्यास आली होती. दुपारी ती जिल्हा रुग्णालयात आली. प्रिझनर वार्ड येथे ड्युटीवरील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना तिने भावाला भेटण्याची विनंती केली. मात्र दोघांनी तिला हाकलून दिले.


याच वाॅर्डचे गार्ड असलेले संशयित कर्मचारी संदीप भाबड येथे आले. त्यांनी महिलेला भावाला भेटू देण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केली. महिलेने नकार दिला असता तिला शिविगाळ केली. पीडितेने मोबाइलवर पोलिसांच्या १०० नंबरवर काॅल करण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने कुंडी फेकून मारली. सुदैवाने कुंडी महिलेला लागली नाही. आई आणि लहान मुलीसह पीडित महिलेने टिबी वॉर्डमध्ये आश्रय घेतला. काही वेळाने सरकारवाडा पोलिस ठाण्यात धाव घेत संशयिताच्या विरोधात तक्रार दिली. तक्रारीची दखल घेत संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित भाबडला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

गार्ड ड्युटीसाठी लाॅबिंग


प्रिझनर वॉर्डमध्ये गार्ड ड्युटी लागण्यासाठी काही कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींकडून लाॅबिंग करत येथे वर्णी लावली असल्याची चर्चा आहे. आता या प्रकरणी पोलिस आयुक्त वादग्रस्त कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करता हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...