आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेटकीण असल्याच्या संशयात महिलेवर जीवघेणा हल्ला, तोंडावर केले धारदार शस्त्राने वार; मग जीभ कापली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - बिहारच्या रोहतास जिल्ह्यात एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर अज्ञात हल्लेखोराने हल्ला केला. धारदार शस्त्राने तिच्या चेहऱ्यावर जोरदार प्रहार करण्यात आले. एवढेच नव्हे, तर हल्लेखोराने त्या शस्त्राने महिलेची जीभ छाटून वेगळी केली. चित्या तोंडातून रक्त थांबतच नव्हते. अतिशय गंभीर जखमी अवस्थेतत तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, काही दिवसांपूर्वीच गावकरी आणि त्या महिलेच्या कुटुंबियांमध्ये वाद झाला होता. लोकांनी तिच्यावर चेटकीण असल्याचे आरोप लावले होते. त्यानंतरच हा हल्ला झाला. 


नातवंडांसोबत झोपली होती, अचानक झाला हल्ला
रोहतास जिल्ह्यातील रेडिया गावात ही महिला आपला मुलगा, सून आणि नातवंडांसोबत राहत होती. सुनेने सांगितल्याप्रमाणे, तिची सासू आपल्या नातवंडांसोबत एका खोलीत रात्री झोपलेली होती. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक एक अनोळखी हल्लेखोर घरात घुसला. त्याने काही समजण्यापूर्वीच त्या महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्याने प्रामुख्याने महिलेच्या तोंडावर वार केले. तसेच तिची जीभ कापून फेकली. बाजूलाच झोपलेली मुले हे दृश्य पाहून प्रचंड घाबरले होते. परंतु, हल्लेखोराने त्यांना शस्त्राचा धाक दाखवून शांत बसवले होते. या महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिलेवर ग्रामस्थांनी काळी जादू करण्याचे आणि चेटकीण असल्याचे आरोप लावले होते. सोशल मीडियावर सध्या ही बातमी व्हायरल होत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...