आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीने विवस्त्र अवस्थेत चौथ्या मजल्यावरून घेतली उडी, आत भावाचे मित्रच करत होते असे काम...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - राजस्थानच्या राजधानीत एका हायप्रोफाईल सोसायटीत तरुणीने विवस्त्र अवस्थेत चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. अपार्टमेंटच्या एका फ्लॅटमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. नकार देत असताना नराधमांनी तिला बेदम मारहाण करून तिचे कपडे फाडले. यानंतर त्या तरुणीने विवस्त्र अवस्थेतच इमारतीवरून उडी घेतली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तरुणीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. तिचे हात-पाय फ्रॅक्चर झाले असून डोक्याला सुद्धा दुखापत झाली आहे. तिच्या जबाबानुसार, पोलिसांनी दोन युवक लोकेश आणि कमल यांना अटक केली. पीडित तरुणी 23 वर्षांची असून ती मूळची नेपाळी आहे. 


मानलेल्या भावानेच फ्लॅटमध्ये बोलावले होते...
अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांनी पोलिसांनी सांगितले, की इमारतीच्या खाली एक मजूर राहतो. त्यानेच सर्वप्रथम पार्किंगजवळ एक तरुणी विवस्त्र आणि जखमी अवस्थेत पडल्याचे पाहिले. त्याने वेळीच अपार्टमेंटच्या लोकांना ही माहिती दिली आणि सगळ्यांनी गर्दी केली. यानंतर गार्डनच्या झाडांमध्ये तरुणी लपलेली होती. तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. तसेच हात-पाय आणि डोक्याला दुखापत झालेली होती. स्थानिक महिलांच्या मदतीने तिला कपडे घालण्यात आले आणि लोकांनी पोलिसांनी फोन लावून या घटनेची माहिती दिली. तिला उपचारासाठी जयपुरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 

मानलेल्या भाऊच घेऊन आला होता...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 दिवसांपूर्वी तिचा मानलेला भाऊ जावेदने तिला जयपूरमध्ये बोलावले होते. त्यानेच तरुणीला या फ्लॅटमध्ये थांबवले होते. जावेद शुक्रवारी तिला या फ्लॅटवर घेऊन आला होता आणि बाहेरून बंद करून निघून गेला. यानंतर रात्री दोन वाजता लोकेश आणि कमल फ्लॅटमध्ये घुसले आणि तिच्यावर बळजबरी करण्यास सुरुवात केली. त्या दोघांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. विरोध करत असताना तिला बेदम मारहाण केली आणि कपडे फाडले. या अत्याचाराला वैतागून तिने चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. पोलिसांनी या प्रकरणात जावेदला सुद्धा आरोपी केले असू त्याचा कसून शोध घेतला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...