आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुरादाबाद - उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद शहरात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या सासऱ्यावर बलात्काराचा आरोप लावला आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिच्या पतीने तिला घरातून हकलले होते. मोठ्या भांडणानंतर दोन कुटुंबियांमध्ये झालेल्या संमतीनंतर ती पतीच्या घरी परतली. परंतु, येथे सासरच्या मंडळींनी तिचा दुरावा तलाक असल्याचे गृहित धरले आणि सासऱ्याने तिला खोलीत डांबून बलात्कार केला. या प्रकरणात तिने आपल्या पती आणि दोन धर्मगुरूंसह एकूण 5 जणांना आरोपी केले आहे.
काय आहे निकाह हलाला..?
शरिआ कायद्यानुसार, पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर ती पत्नी पतीसाठी हराम ठरवली जाते. तिला पुन्हा स्वीकारण्यासाठी निकाह हलाला करावा लागतो. यात पहिल्या पतीकडे परतण्यापूर्वी पत्नीने दुसऱ्याशी निकाह करणे आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर घटस्फोट देऊन वैध बनवले जाते. यानंतर इद्दत नावाचा ठराविक काळ दूर राहिल्यानंतर ती पहिल्या पतीसोबत पुन्हा निकाह करू शकते. याला भारतात विरोध होत आहे. तसेच हा वाद सुप्रीम कोर्टातही गेला.
नेमके काय घडले या महिलेसोबत?
> मुरादाबाद येथे राहणाऱ्या महिलेने आरोप केला, 2014 मध्ये तिचा बरेलीत राहणाऱ्या एकाशी निकाह झाला होता. परंतु, लग्नाच्या वर्षभरानंतरच 2015 मध्ये तिच्या पतीने घरातून बाहेर काढले. तिने माहेरी परतल्यानंतर जानेवारी 2016 मध्ये तिने आपल्या पतीच्या विरोधात मानसिक आणि शारीरिक त्रास देण्याचा आरोप दाखल केला. त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात दोन्ही कुटुंबांमध्ये एक करार झाला आणि ती आपल्या पतीकडे राहण्यासाठी परत गेली. हीच तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली.
> तिला पतीने भांडणानंतर हकलले होते. परंतु, जेव्हा ती पतीच्या घरी परतली तेव्हा सासरच्या मंडळींनी त्या दोघांचा दुरावा तलाक गृहित धरले. यानंतर सासरा, काका-सासरा, पती आणि दोन धर्मगुरूंनी तिचा निकाह हलाला करण्याचा निर्णय घेतला. पीडितेने लावलेल्या आरोपानुसार, तिने या गोष्टीचा तीव्र विरोध केला. परंतु, काका सासरा आणि त्या कथित धर्मगुरूंनी महिलेला बळजबरी पकडून तिचा सासऱ्यासोबत निकाह लावला. त्याच दिवशी तिला एका खोलीत सासऱ्यासोबत डांबण्यात आले आणि सासऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सासऱ्याने तिला तलाक दिला.
बाळाला दिला जन्म
पोलिसांत नमूद झालेल्या तक्रारीनुसार, पीडितेच्या सासऱ्याने बलात्कार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिच्या पतीने सुद्धा बलात्कार केला. यानंतर तिला गर्भधारणा झाली. गतवर्षी पीडित महिलेने एका मुलाला जन्म दिला आहे. तिने आपल्यावर घडलेल्या या अत्याचाराची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे सुद्धा केली. परंतु, पती आणि त्याच्या कुटुंबियांनी पीडितेच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली. अखेर शनिवारी पोलिसांत तिची तक्रार दाखल करण्यात आली आहे. यात तिचा पती, सासरा आणि काका-सासरा यांना मुख्य आरोपी करण्यात आले असून त्या दोन धर्मगुरूंवर सुद्धा सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.