आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापॅरिस - फ्रान्समध्ये राहणाऱ्या मुलीला केस डाय करणे चांगलेच महागात पडले. डाय लावताच तिच्या डोक्याला चांगलीच खाज सुटली आणि चेहराही मोठ्या प्रमाणावर सुजला. तिची अवस्था एवढी खराब झाली की, तिचे शरीर फुगून बल्बसारखे झाले. तिला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. विशेष म्हणजे डाय लावण्याआधी तिने अॅलर्जी टेस्टही केली होती. पण त्यादरम्यान तिने एक चूक केली ती तिला महागात पडली.
थोडक्यात बचावला जीव
- पॅरिसमध्ये राहणाऱ्या 19 वर्षीय अॅश्लेची तब्येत डाय लावल्यानंतर एवढी बिघडली की, जवळपास मृत्यूच्या दाढेत पोहोचली होती.
- अॅश्लेने सुपमार्केटमधून डायचे पाकिट विकत आणले आणि अॅलर्जी टेस्टनंतर ते तिने डोक्यावर लावले होते. पण काही तासातच तिचे डोके प्रचंड खाजायला लागले. सूजही यायला सुरुवात झाली.
- दुसऱ्या दिवशी ती झोपून उठली तेव्हा तिच्या चेहऱ्याची रुंदी 63 सेंटीमीटर (जवळपास 2 फूट) झाली होती.
- एका इंटरव्ह्यूमध्ये तिने सांगितले होते की, तिचे डोके लाइट बल्ब सारखे झाले होते. मला श्वासही घेता येत नव्हता. तब्येत बिघडल्यानंतर ती हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हा तिला इमर्जन्सी रूममध्ये ठेवण्यात आले.
- उपचारांनंतर तिचा जीव वाचला पण अजूनही तिच्या चेहऱ्यावर सूज पाहायला मिळते. तिचे म्हणणे आहे की, डायचा वापर करताना एक चूक झाल्याने तिची अशी अवस्था झाली होती.
- तपासात समोर आले की, ही अॅलर्जी हेअरडायमध्ये असलेले एक केमिकल PPD (पॅराफेनिलेनेडियम) मुळे झाली. हे केमिकल जवळपास प्रत्येक ब्युटी प्रोडक्टमध्ये असते.
एक चूक भोवली
- अॅश्लेचे म्हणणे आहे की, तिच्या एका चुकीमुळे तिची अशी अवस्था झाली. डायच्या पाकिटावरील निर्देशांनुसार डोक्यावर लावण्यापूर्वी डाय हाताच्या एका लहान भागावर लावून अॅलर्जी टेस्ट करायला हवी. त्यानंतर 48 तास रिअॅक्शन होते का याची वाट पाहावी लागते.
- अॅश्लेनेही ही टेस्ट केली होती, पण तिने फक्त अर्धा तास वाट पाहिली. काही होते का हे कळण्याआधीच तिने डोक्याला डाय लावली.
- अॅश्लेला ही चूक महागात पडली. आता ती लोकांना याबाबत माहिती देण्याचे काम करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.