आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Crime: या मेहुणी-भाऊजीने केला असा कांड, पोलिसांनाही फुटले घाम; अशी झाली अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - देशात बलात्काराची प्रकरणे वाढत असताना सर्वच आरोपींना फाशीची मागणी केली जात आहे. त्याचा काही समाजविघातक लोक गैरफायदा देखील घेताना दिसून येतात. राजस्थानच्या झुंझुनू येथे असेच एक प्रकरण समोर आले आहे. येथे राहणाऱ्या एका तरुणीने आपल्या भाऊजींसोबत मिळून असा कट रचला, की पोलिसांनी देखील डोक्याला हात लावले. त्या दोघांनी आपल्या कट कारस्थानातून पोलिस कर्मचाऱ्याकडूनच लाखो रुपये लुटले. परंतु, अखेर मंगळवारी या दोघांना सापळा रचून अटक करण्यात आली आहे. 


पोलिसांना केली 20 लाख रुपयांची मागणी
> झुंझुनू येथे राहणाऱ्या एका महिलेने गेल्या वर्षी आपल्या भावजीच्या सांगण्यावरून हवालदार महिपाल सिंह विरोधात बलात्काराचा आरोप दाखल केला. यात तिने महिपालसह इतर दोन जणांना आरोपी केले. आपल्यावर सामुहिक बलात्कारासाठी जबाबदार धरले होते. सीकर जिल्ह्यातील कोलिडा गावाचा रहिवासी असलेल्या महिपाल सिंह विरोधात पुरावे नसल्याचा अहवाल पोलिसांनी सीकर न्यायालयात सादरही केला. परंतु, कोर्टाने महिलेच्या तक्रारीवरून त्याला आरोपी मानत खटला सुरू केला. 
> आपल्यावर खोटे आरोप लावले जात असल्याचे हवालदाराने कोर्टात सांगितले. परंतु, कोर्टाने त्याच्या वकिलांचा युक्तीवाद फेटाळून लावला. यानंतर संबंधित महिला आणि तिच्या भाऊजीने त्या हवालदाराशी संपर्क साधून भेटण्यासाठी बोलावले. यानंतर त्यांनी आपण जबाब बदलण्यासाठी आणि कोर्टात त्याला निर्दोष ठरवण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. परंतु, असे करण्यासाठी 20 लाख रुपये मोजावे लागतील असे हवालदाराला सांगितले. 


असे पकडले...
> महिपालने त्या महिला आणि तिच्या भाऊजीसमोर खूप विनंत्या केल्या. तसेच 20 लाख रुपये आपण कुठल्याही परिस्थितीत भरू शकणार नाही असे सांगितले. यानंतर त्यांची डील कमी होत-होत 6.5 लाख रुपयांवर आली. महिलेच्या भाऊजीने सुनावणीपूर्वी 1 लाख रुपये घेऊन सुनावणीनंतर 5.50 लाख रुपये घेणार असे सांगितले. यानंतर हवालदाराने आपले डोके चालवले. 
> त्याने यानंतर त्या दोघांशी फोनवर संवाद साधला आणि प्रत्येक संवाद रेकॉर्ड करून ठेवला. हेच कॉल रेकॉर्ड आपल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे घेऊन गेला. या आधारावर पोलिसांनी सापळा रचला. महिपालच्या हातात 5.5 लाख रुपये देऊन भाऊजी-मेहुणीला भेटण्यासाठी बोलावले. तसेच रक्कम देताना त्यांना रंगेहात पकडून कोर्टात सादर केले. 

बातम्या आणखी आहेत...