आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबूकवर तरुणीशी मैत्री करून फसला सैनिक: आधी गोड-गोड बोलायची, आता रोज पाठवते न्यूड सेल्फी; पोलिसांत तक्रार दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर - पंजाबच्या गडदीवाला परिसरात एका सैनिकाने फेसबूकच्या माध्यमातून एका तरुणीशी मैत्री केली. या मैत्रिणीने आता या जवानाने जगणे कठिण केले आहे. सुरुवातीला फेसबूकवर मैत्री आणि त्यानंतर दोघांनी व्हॉट्सअॅप नंबर एक्सचेंज केले. गोड-गोड बोलणे सुरू झाले आणि एकदा भेटही झाली. परंतु, तिने आपला चेहरा जवानाला दाखवला नाही. काही दिवसांतच चेहरा न दाखवता तरुणीने आपले अश्लील आणि न्यूड सेल्फी पाठवण्यास सुरुवात केली. आता त्याच सेल्फी आणि फोटोंवरून तरुणीने जवानाचा छळ सुरू केला आहे. 


आता ब्लॅकमेल करतेय तरुणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करात जवान असलेल्या मंदीप सिंगचा भाऊ संदीपच्या तक्रारीवरून महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, सुरुवातीला दोघांची फेसबूकवर मैत्री झाली. तिने मंदीपला गोड बोलण्यास सुरुवात केली. काही दिवसांतच तिने आपले न्यूड फोटो पाठवण्यास सुरुवात केली. आता त्याच फोटोवरून ती तरुणी सैनिकाला ब्लॅकमेल करत आहे.


भेटीतही चेहरा दाखवला नाही...
रोज होणाऱ्या चॅटिंगनंतर दोघांनी भेटण्याचे ठरवले होते. त्यानुसार, 28 जुलै रोजी एका फास्ट फूड शॉपमध्ये दोघांची भेट झाली. परंतु, तिने आपला चेहरा सैनिकाला दाखवला नाही. आस-पास आपल्या परिचयाचे लोक असल्याचे सांगून तिने आपला चेहरा लपवून ठेवला. तक्रारीनंतर पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतले तसेच तिची चौकशी केली असता तिने आपल्यावरील आरोप मान्य केले आहे. जवानाने आग्रह केला नव्हता. तरीही मुद्दाम आपणच घरातून न्यूड सेल्फी पाठवल्या अशी कबुली तिने दिली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...