आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साई बाबा मंदिरात प्रसादातून गुंगीचे औषध देऊन भाविकांची लूट, झारखंडच्या महिलेला पोलिसांनी केले अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- धार्मिक स्थळांवर कशाप्रकारे तुम्हाला लुटले जाऊ शकते याचे ताजे उदाहरण शिर्डीतून समोर आले आहे. साई मंदिरातील प्रसादात गुंगीचे औषध टाकून एका वयोवृद्ध महिलेचे दागिने चोरणाऱ्या परप्रांतीय महिलेला मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी मोठ्या चलाखीने पकडले. साई बाबांच्या प्रसादात एक महिला चोर गुंगीचे औषध टाकून तो प्रसाद महिला भक्तांना देऊन त्यांचे दागिणे लुटत होती.


साई बाबांच्या दुपारच्या आरतीनंतर भाविकांना मंदिर परिसरात संस्थानच्या वतीने शिऱ्याच्या प्रसादाचे वाटप होते. या प्रसादात झारखंड येथील पिंकी नावाच्या महिलेने गुंगीचे औषध टाकून तो प्रसाद एका स्थानिक महिलेना देऊन तिचे दागिने लुटले. अशा प्रकारे ती अनेकांना  लुटले असल्याचा संशय पोलिसांना आहे. मंदिर सुरक्षा रक्षकांनी महिलेवर पाळत ठेऊन मोठ्या चलाखीने तिला अटक केली. महिलेला पकडल्यावर तिने पोलिसांसमोर चोरीचा गुन्हा कबुल केला आहे.


19 जून रोजी दुपारी 1 वाजता शिर्डीतील राहणारी वयोवृद्ध महिला छबुबाई गरड यांनी नेहमीप्रमाणे साईबाबांची दुपारची आरती पार झाल्यानंतर आरतीचा प्रसाद घेण्यासाठी मंदिराजवळ गेल्या असता तिथून महिलेने प्रसाद दिला. छबुबाई यांनी प्रसाद खाल्ल्यानंतर थोड्याच वेळात त्यांना गुंगी येऊन तेथेच पडल्या. थोड्या वेळाने शुद्धीत आल्यानंतर आपल्या गळ्यातील तीन ग्रॅम सोन्याची पोत आणि काही पैसे चोरी गेल्याचे लक्षात आले. ही माहिती छबुबाई यांनी संस्थानच्या सुरक्षा रक्षकांना दिली. या माहितीच्या आधारे संस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी 19 जून रोजी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यात आरोपी महिला आजीच्या गळ्यातील दागिणे काढून घेत असल्याचे दिसले. त्यानंतर संस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी महिलेचा तपास सुरू केला. अखेर ही महिला पुन्हा साई मंदिर परिसरात दिसून आल्याने या महिलेला पकडून सुरक्षा रक्षकांनी तिला संरक्षण कार्यालयात नेले. अधिक चौकशीअंती पिंकी चोर असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनतर मंदिर सुरक्षा विभागाने तिला शिर्डी पोलिसांच्या स्वाधीन केले.