आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये आली होती महिला, सततच्या आर्डरने वैतागला वेटर, केला जीवघेणा हल्ला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अंधेरीतील एका हॉटेलमध्ये वेटरने विदेशी महिलेवर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. महिला लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पतीसोबत हॉटेलमध्ये आली होती. महिलेच वेटरला वारंवार आर्डर करत होती. त्यामुळे वेटर वैतागला होता. रागाच्या भरात त्याने महिलेवर चाकूने हल्ला केला. पोलिसांनी आरोपी वेटरला अटक केली  आहे.

 

काय आहे प्रकरण?
निशांत गौडा असे आरोपी वेटरचे नाव आहे. अंधेरीतील जेबी नगर येथील कोशिया सुइट्स हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. पीडित महिला 5 जानेवारीला रात्री हॉटेलमध्ये लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आली होती. ती रूम नंबर 204 मध्ये थांबली होती. ती वेटरला वारंवार काही ना काही आणण्‍यास सांगत होती. तिच्या अशा वागण्याने वेटर निशांत गौडा अक्षरश: वैतागला होता. त्याने रागाच्या भरात विदेशी महिलेवर चाकूने वार केला. या हल्लात महिला जखमी झाली आहे.

 

केक कापण्यासाठी आणलेल्या चाकूनेच केला हल्ला..

मिळालेली माहिती अशी की, महिलेने वेटरला आधी प्लेट आणण्यास सांगितले. नंतर त्याला पाण्याची बाटली, त्यानंतर लगेच त्याला केक कापण्यासाठी चाकू आणण्याचे फर्मान सोडले. या सगळ्या प्रकारामुळे वेटर वैतागला आणि त्याने महिलेवर केक कापण्यासाठी आणलेल्या चाकूने हल्ला केला.

बातम्या आणखी आहेत...