आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Recall: लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी पतीच्या खुनाने रंगले नवरीचे हात, घटना सीसीटीव्हीत कैद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - मुलीच्या हातावरची मेंदी अजून नीट रंगलीही नव्हती की जन्मदात्री आईच तिच्या कुंकवाची वैरीण बनली. लव्ह मॅरेजमुळे नाराज आईने लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच पोलिस स्टेशनमध्ये जावयावर जीवघेणा हल्ला केला. नवऱ्याला वाचवताना मुलीचे मेंदीचे हात रक्ताने रंगले. पोटच्या मुलीचे कुंकू पुसायला निघालेल्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


असे आहे प्रकरण...
- बावडी परिसरातील शानू ऊर्फ प्रेरणा महाजन आणि भावसार कॉलनीतील सागर धारे आपसात प्रेम करत होते. दोघांना लग्न करायचे होते पण प्रेरणाच्या आईला हे मंजूर नव्हते. दोघेही 17 ऑगस्टला कोणालाही काहीही न सांगता घरातून पळाले आणि इंदुरात येऊन कोर्ट मॅरेज केले.
- प्रेरणा गायब झाल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी ती हरवल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली. पोलिस दोघांचा शोध घेत होते. 19ला दोघेही खरगोनला परतले आणि सरळ पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले. ते आल्याची माहिती मिळताच सीमाही आपल्या पती आणि मुलासह पोलिस स्टेशनमध्ये आली.
- तेथे आल्यावर सीमा आधी शांत होती, पण घरूनच ती सागरला मारण्याचा प्लॅन करून आली होती. तिने आपल्या साडीत एक खंजीर आणि एक मोठा चाकू लपवून आणला होता. सागरच्या जबाबादरम्यान ती वॉशरूममध्ये गेली आणि अचानक चाकू काढून तिने सागरवर हल्ला चढवला. चाकूने ती सागरच्या पाठीवर लगातार सपासप वार करत होती. तिच्यापासून वाचण्यासाठी सागर पोलिस स्टेशनबाहेर पळाला. पोलिसांनी कशीबशी त्याची सासू सीमाच्या तावडीतून सुटका केली.
- हे पाहून प्रेरणा आपल्या नवऱ्याला वाचवायला धावली. सागरची पाठ आणि मानेतून रक्त वाहत होते, प्रेरणाने लगेच त्याच्या जखमांवर आपला रुमाल ठेवला. प्रेरणाचे मेंदीचे हात सागरच्या रक्ताने माखले होते. नवऱ्यावर आईने केलेल्या या अनपेक्षित हल्ल्याने तिला काही सुचेनासे झाले होते. नंतर सागरच्या मित्रासह ती त्याला घेऊन रुग्णालयात गेली.


म्हणाली, आईला शिक्षा झाली पाहिजे...
- मेंदी भरल्या हातांवरचे नवऱ्याचे रक्त दाखवत प्रेरणा म्हणाली, मला स्वप्नातही वाटले नव्हते की माझी सख्खी आई माझ्यासोबत असे काही करेल. माझ्या लव्ह मॅरेजमुळे माझे वडील आणि भावाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. फक्त मम्मीलाच आक्षेप होता. मला वाटले होते, मम्मीही समजून घेईल. पण तिने तर माझ्या कुंकवालाच मिटवण्याचा प्रयत्न केला. मी तिच्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. तिला कडक शिक्षा झाली पाहिजे.


पुढच्या स्लाइड्सवर पाहा, घटनेचे काही PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...