आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील महिला बचत गटांसाठी आता "हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची" योजना सुरू, उत्कृष्ट उत्पादन करणाऱ्या बचत गटांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे अर्थ सहाय्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पापरी- उद्योग व्यवसायात हल्ली महिलांचा सहभाग वाढला असल्याने महिलांच्या बचत गटांच्या नाविन्यपूर्ण उद्योग व्यवसायास प्रोत्साहन व अवशक्य मार्गदर्शन करण्यासाठी तालुका व जिल्हा स्तरावर व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय ग्रामीण जीवन ज्योती अभियान, राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान तसेच राज्य व केंद्र शासनाच्या योजना अंतर्गत स्थापन होवून किमान 1 वर्ष पूर्ण केलेले, केंद्र व राज्य शासनाच्या निकशानुसार दश सुत्रीचे पालन करणारे महिला बचत गट या योजनेत सहभागासाठी पात्र ठरणार आहेत. 

 

एखादा बचत गट पारंपारिक व्यवसाय मोठ्या स्तरावर वेगळ्या पद्धतीने करत असेल तर तो ही यासाठी पात्र राहणार आहे. ही योजना लातूर जिल्ह्यात प्रथमतः प्रायोगिक तत्वावर राबवण्यात आली होती. त्यात आढळून आलेले बचत गटांनी राबवलेले काही नाविन्यपूर्ण उपक्रम कल्पना पुढील प्रमाणे असून यांना उदाहरणे म्हणून बचत गटांना सांगता येतील- जवळ पासच्या गावा मधल्या शाळकरी मुला मुलींसाठी शाळेच्या बस चे व्यवस्थापन करने, गावातल्या महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन बनविने, लहान मुलांसाठी कपड्याचे डायपर बनवणे, लिंबापासून टॉयलेट क्लीनर फेसवॉश व साबन तयार करने, सोयाबीन पासून पापड़, चिवड़ा, पनीर वस्तु तयार करने, कागद आणि कापडा पासून पिशव्या तयार करून जवळच्या शहरात विकणे, टाकाऊ प्लास्टिक पासून विविध वस्तु तयार करने इत्यादी.


नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यास इछुक बचत गटांना याद्वारे तालुका स्तरावर उद्योग क्षेत्रात चालना देण्यात येणार असून विविध वस्तुंचे उत्पादन करणाऱ्या बचत गटापैकी नाविन्य पूर्ण व उत्कृष्ट उत्पादनांची निर्मिति करणाऱ्या 10 बचत गटांची निवड करण्यात येणार आहे. निवड केलेल्या बचत गटांना त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी व त्यांची विक्री होण्यासाठी पायाभूत सुविधा निरमान करण्यासाठी लाखो रुपयांचे अर्थ सहाय्य करण्यात येणार आहे.तरी या योजनेत तालुक्यातील महिला बचत गटांनी सहभागी होवून आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पाना चालना द्यावी अधिक माहितीसाठी पं स स्तरावरील एनआरएलएम,तालुका अभियान कक्ष यांच्याशी संपर्क साधावा असेही येळे यांनी सांगितले.

  हिरकनी महाराष्ट्राची स्पर्धे अंतर्गत या घटकांचा देखील विचार करण्यात येणार आहे-उत्पादना बाबत गटाला असलेली स्पष्टता,कल्पनेची ,उत्पादनाची नाविन्यता काय,कल्पना समाजासाठी किती प्रभावशाली व उपयोगाची आहे,गटाच्या सर्व सदस्याचा त्यात किती सहभाग आहे,कल्पना ,निर्माण केलेले उत्पादन दीर्घ कालासाठी किती उपयोगी आहे.


हिरकणी हे नाव का?

हिरकणी महाराष्ट्राची असे आगळेवेगळे नाव देण्याची पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे. हिरकणी हे नाव सर्वांना माहित आहे. रायगडावर दूध घालणारी गवळण हिरकण होती. गडाचे दरवाजे बंद झाल्यावर माझ्या लेकराचं कसं होईल या भीतीने रात्रीच्या बुरुजावरुन उतरली आणि तिचा हा असामान्य पराक्रम पाहून छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या बुरुजाला हिरकणीचे नाव दिले. हिरकनी हा ब्रैंड करण्यासाठी हे नाव देण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...