आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेला वारंवार कॉल करून म्हणायचा मला फ्रेंडशिप करायची... महिलेने म्हटले मग भेटायला ये... पहिल्या भेटीतच घडले असे काही...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव-फोन व व्हिडिअो काॅल करून त्रस्त करणाऱ्या युुवकाला अाशाबाबा नगरातील महिलेने ट्रू काॅलरद्वारे त्याचा माग काढला. त्यानंतर फुले मार्केटमध्ये असलेल्या त्याच्या दुकानावर जाऊन चपलेने चोपत थेट शहर पोलिस ठाण्यात अाणले. त्यानंतर त्याला सायबर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

 

निहाल हमीद बागवान (वय ३०, रा.शाहूनगर) असे त्या युवकाचे नाव अाहे. तो त्याच्या मोबाइल क्रमांकावरून महिलेच्या मोबाइलवर मिस्ड काॅल देत होता. शुक्रवारी सकाळपासूनच तो मिस्ड काॅल करीत होता. एका कार्यक्रमानिमित्त संबंधित महिला तयारी करीत होती. त्यामुळे त्यांना मोबाइलवर अालेल्या मिस्ड काॅलबाबत कळले नाही. कामातून थोडीसी उसंत मिळाल्यानंतर त्यांना मोबाइलवर मिस्ड काॅल दिसले. त्यानंतर काही वेळात निहाल याने थेट व्हिडिअो काॅल करून भिवंडी येथे राहत असल्याचे सांगितले. मैत्री करायची असल्याबाबत तो बोलला. तो मराठीतून बोलत होता. त्याच्या या अाक्षेपार्ह बोलण्याचा त्या महिलेला राग अाला. वारंवार फोन येत असल्यामुळे महिलेने या प्रकाराबाबत पतीला माहिती दिली. तो भिवंडी येथून बोलत असल्याचे सांगत होता. त्यामुळे त्याचा नेमका पत्ता काय, याबाबत माहिती काढण्याचा निर्णय घेतला. महिलेच्या पतीने निहाल याचा मोबाइल क्रमांक ट्रू काॅलरवर टाकला. त्यावर फुले मार्केटमधील दुकानाचे नाव अाले. त्यानंतर त्या महिलेने त्याला फोन केला. त्रस्त झालेल्या महिलेने त्याला बोलण्यात गुंग ठेवले. फोनवर बोलत महिला थेट फुले मार्केटमध्ये पतीसह त्याच्या दुकानापर्यंत गेली. फोन करून त्रास देत असल्याबद्दल त्याला विचारणा करून पायातील चप्पल काढून त्याला चांगलाच प्रसाद दिला. 

 

संशयिताला दिले पोलिसांच्या ताब्यात 
दांपत्याने पकडून संशयिताला शहर पोलिस ठाण्यात अाणले. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण निकम यांची भेट घेऊन दांपत्याने या प्रकाराबाबत तक्रार केली. मात्र, हे सायबर क्राइम असल्याने त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देण्यास सांगितले. त्यामुळे पोलिसांनी निहाल याला सायबर पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात अालेला नाही.