आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Call करून म्हणायचा- 'तुझ्या प्रेमात पार बुडालाेय', विवाहिता म्हणाली- 'खरंच, एकदा भेटूयात मग!' पाहा या 'भेटी'चा Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैमूर, बिहार - एक तरुण मागच्या अनेक दिवसांपासून विवाहितेला मोबाइलवर कॉल करून आपले प्रेम व्यक्त करत होता. म्हणायचा- 'हमें तुमसे प्यार हो गया है!' आधी महिलेने दुर्लक्ष केले. परंतु महिलेच्या गप्प बसण्यालाच तरुणाने होकार समजला. तो सतत कॉल करून त्रास देऊ लागला. शेवटी महिलेने त्याला म्हटले- 'ठीक आहे, एकदा आपण भेटूयात!' यावर तरुण अप-टू-डेट होऊन भेटायला गेला. परतु तेथे पोहोचताच त्याच्या 'प्रेमाचे भूत' उतरले. महिलेने त्याची यथेच्छ धुलाई केली. महिलेच्या या धाडसाचे तेथे उपस्थित लोकांनी कौतुक केले.

 

- ही घटना भभुआमधील आहे. महिलेने तरुणाला नगर परिषद कॅम्पसमध्ये भेटायला बोलावले होते. तेथे महिला आपल्या सोबत काही परिचितांना घेऊन आली होती. तेथे तरुण पोहोचताच, महिलेने त्याची धुलाई केली. या घटनाक्रमानंतर त्या तरुणाने माफी मागत तेथून पाय काढला. चंदन कुमार असे एकतर्फी प्रेमवीराचे नाव आहे.
- तरुणाला मार खाताना पाहून तेथे उपस्थित काहींनी त्याचा व्हिडिओ शूट केला. जवळजवळ 15 मिनिटे महिला त्याला बदडत होती. कुणीतरी याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचा व्हिडिओ व Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...