आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण; श्रीगोंदे तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे- नगर जिल्ह्यातील भानगाव (ता. श्रीगाेंदे) येथे ३५ वर्षांच्या आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. ही घटना १२ सप्टेंबरला घडली. या प्रकरणी चार जणांच्या विरोधात अनुसूचित जाती-जमाती कायदा कलमासंह मारहाण, तसेच विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


शेजारच्या शेतात शेळी का नेली, या कारणावरून या महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात अाल्याचे पाेलिसात दाखल झालेल्या तक्रारीत म्हटले अाहे. तिच्या पतीलासुद्धा जबर मारहाण झाल्याचे समोर आले. याबाबत श्रीगोंदे ठाण्यात १४ ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित कुटुंब भटक्या समाजाचे अाहे, तर संतोष वाघस्कर, जयसिंग वाघस्कर, मनोहर वाघस्कर, कुटे अशी आरोपींची नावे आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...