आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील हॉस्पिटलमध्ये आजीच्या गर्भात वाढतोय नातू, विज्ञानाचा असाही अविष्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - गुजरातच्या भारुच येथील महिला गर्भाशय प्रत्यारोपणानंतर गर्भवती राहिली आहे. पुण्यातील हॉस्पिटलमध्ये ही महिला उपचार घेत आहे. गर्भाशय प्रत्यारोपणाच्या माध्यमातून आई बनण्याचा आनंद तिला अनुभवता येत आहे. पण यात आणखी एक विशेष म्हणजे तिच्या आईने तिला हे गर्भाशय दिले आहे. 

 

माझा जन्म झाला त्या गर्भातूनच माझे बाळ जन्म घेणार 
या महिलेला तिच्या आईनेच गर्भाशय दान केले आहे. त्याच्या प्रत्यारोपणानंतर ती आता गर्भवती असल्याने अत्यंत आनंदी आहे. याबाबत बोलताना महिला म्हणाली की, ज्या गर्भाशयातून माझा जन्म झाला, त्याच गर्भाशयातून आता माझे बाळही जन्म घेणार आहे याचा मला अत्यंत आनंद होत आहे. 


गर्भाशयाविनाच जन्मली होती महिला 
गुजरातच्या ज्या महिलेला गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात आले होते, ही महिला गर्भाशयाविनाच जन्माला आली होती. तिच्या आईचे गर्भाशय प्रत्यारोपण करून तिला बसवण्यात आले होते. गेल्या 20 वर्षांत अशा प्रकारची डिलेव्हरी झालेली नसल्याचे पुण्यातील डॉक्टर शैलेष पुणतांबेकर यांनी सांगितले. प्रत्यारोपित गर्भाशयाद्वारे होणारी ही आशियातील पहिली आणि जगातील नववी डिलेव्हरी ठरणार असल्याचेही डॉक्टर म्हणाले. 

 

बातम्या आणखी आहेत...