Home | National | Other State | Woman beggar caught with more than 2 lakh cash and jewellery in Hyderabad

सुनांनी घराबाहेर काढल्यानंतर भीक मागून इतकी श्रीमंत झाली सासू; पोलिसांनी धाडीत सापडला लाखोंचा मुद्देमाल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 08, 2018, 12:27 PM IST

पोलिसांनी तिची कहाणी ऐकूण बँक खाते उघडून दिले आणि राहण्याची व्यवस्था केली.

 • Woman beggar caught with more than 2 lakh cash and jewellery in Hyderabad

  हैदराबाद - येथील एका वयोवृद्ध महिलेला काही वर्षांपूर्वी तिच्या सुनांनी घराबाहेर हकलून दिले. मुलांनीही साथ सोडल्याने तिच्याकडे भीक मागून पोट भरण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नव्हता. तेव्हापासूनच ती ठिक-ठिकाणी थांबून पैसे मागून जगत होती. परंतु, याच माध्यमातून तिने इतका पैसा गोळा केला की आज ती लखपती बनली आहे. पोलिसांनी भिकाऱ्यांच्या ठिकाणावर धाड टाकल्यानंतर या महिलेची झडती घेतली. तेव्हा तिच्या गाठोड्यातून लाखो रुपये कॅश आणि दागिने सापडले आहेत.


  एकेकाळी होते स्वतःचे घर
  भिकारीचे आयुष्य जगणाऱ्या या महिलेचे नाव पेंतम्मा असे आहे. एकेकाळी तिचे स्वतःचे घर होते आणि ती आपल्या दोन मुलांसोबत सुखी आयुष्य जगत होती. मरताना पतीने तिच्या नावे जमीन सोडली होती. परंतु, कालांतराने मुलांना बिझनेससाठी पैसा उभा करताना तिने 2 लाखात ती जमीन विकली. पेंतम्माने यातील 1 लाख मुलांना दिले आणि काही पैसे स्वतःकडे ठेवले. मग, काही दिवसांत तिच्या मुलांचा विवाह झाला आणि तिच्या आयुष्यात उतरती कळा लागली.


  एका मुलाचा मृत्यू, दुसरा बेपत्ता
  2005 च्या सुमारास तिच्या दोन्ही मुलांचे लग्न झाले. कुटुंब वाढले आणि सर्व काही सुरळीत सुरू होते. यानंतर अचानक तिच्या मोठ्या मुलाचे निधन झाले. घरात पैश्यांच्या अडचणी निर्माण झाल्या. दुसऱ्या मुलानेही कमवणे बंद केले आणि एक दिवस तो घर सोडून निघून गेला. सुनांसोबत तिने बाहेर काम करण्यास सुरुवात केली होती. परंतु, वाढत्या वयामुळे तिला ते जमले नाही. कित्येक दिवस सासूला उपाशी ठेवले यानंतर वैतागून तिला घराबाहेर हकलून दिले. 2011 मध्ये ती हैदराबादच्या मसारामबाग येथे टीव्ही टॉवरजवळ थांबून भीक मागण्यास सुरुवात केली. ती ज्या ठिकाणी बसत होती तेथील लोक भर-भरून दान करायचे. यातून तिने बचत करण्यास सुरुवात केली.


  गाठोड्यात सापडले इतके पैसे...
  पोलिसांनी सिग्नलवर थांबणाऱ्या पेंतम्माची चौकशी करताना तिचे गाठोडे तपासले. त्यातून मिळालेल्या नोटा आणि चिल्लर पाहून सगळेच हैराण झाले. पेंतम्मा भीकमधून बचत करून तब्बल 2 लाख 34 हजार 320 रुपये जमा केले होते. एवढेच नव्हे, तर तिच्याकडे सोने आणि चांदीचे काही दागिने सुद्धा सापडले आहेत. त्यांची किंमत सुद्धा लाखोंमध्ये आहे. पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा तिची ही कहाणी समोर आली. यानंतर पोलिसांनी पेंतम्माची मदत केली. तिचे एका राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून दिले आणि त्यामध्ये तिची बचत जमा केली. सोबतच तिला पुनर्वसन केंद्रात राहण्यासाठी पाठवण्यात आले आहे.

Trending