आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉकिंग : प्रेग्नंसीच्या बातमीने आनंदी झाली 22 वर्षांची तरुणी, पोट पाहून वाटले 8 वा महिना असेल, अल्ट्रासाऊंडनंतर संभ्रमात पडले डॉक्टर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वानसी - वेल्सची राहणारी 22 वर्षीय केअररचे पोट वेगाने मोठे होत होते. तिचे कुटुंबीय आणि मित्र यांना ती गर्भवती असल्याचे वाटू लागले. अखेर केयररने प्रेग्नंसी टेस्ट केली तर ते खरेही ठरले. तिचे पोट पाहून ती जवळपास 8 महिन्यांची प्रेग्नंट असल्यासारखे वाटत होते. डॉक्टरनेही पोट पाहून तसेच म्हटले. पण अल्ट्रासाउंड केल्यानंतर भलतेच काही समोर आले. डॉक्टरांच्या मते ती फक्त 6 आठवड्यांची गर्भवती होती. तर पोट वाढल्याजचे कारण यूट्रसमध्ये सिस्ट (गाठ) असणे हे होते. 


रिपोर्टमध्ये समोर आले सत्य 
- स्वानसीची राहणारी क्रिस्टी बटलर आणि तिचा पार्टनर सेलर्नला जेव्हा प्रेग्नंसीची बातमी मिळाली तेव्हा दोघांच्या आनंदाला पारावार उरला नाही. दोघे आणी मुलांबाबत फारच एक्साइटेड होते. 
- क्रिस्टीने तिचे पोट खूप निघाल्यामुळे टेस्ट केली होती. तिला वाटले की, प्रेग्नंसीला खूप वेळ झाला आहे. डॉक्टरांनाही पोटाचा आकार पाहून तसेच वाटले. पोट पाहून डॉक्टरांनी तिला 8 महिन्यांची प्रेग्नंट म्हटले. 
- क्रिस्टीचे पोट सरासरीपेक्षा 4 पट जास्त मोठे होते. बाळाचा विकास आणि इतर तपासण्यासाठी डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंड केले तेव्हा वेगळीच बाब समोर आली. 


पोटात होती गाठ 
- डॉक्टरांनी सांगितले की, अल्ट्रासाऊडमध्ये तिची प्रेग्नंसी फक्त 6 आठवड्यांची असल्याचे समोर आले. ज्याला ते बेबी बंप समजत होते ती जवळपास 30 सेंटीमीटरची एक गाठ होती. त्यामुळे गर्भाशयाला नुकसान होत होते. 
- हे ऐकताच कपलचा आनंद दुःखात बदलला गेला. कारण बाळाच्या जीवालाही धोका निर्माण झाला होता. क्रिस्टीचे जीवन सुरक्षित राहावे यासाठी सर्जरी करावी लागणार होते. 


बाळ गमावले.. 
- डॉक्टर्सनी सर्जरीचा निर्णय घेतली आणि बाळाला वाचवण्यासाठी अनेक तास झटले. पण अखेर क्रिस्टीने बाळ गमावले. 
- कपलला बाळ गमावल्याचा मोठा धक्का बसला पण क्रिस्टीच्या जीवाचा मोठा धोका टळल्याचे त्यांना समाधान होते. कारण गाठ वाढली असती तर ओव्हरी फाटली असती. 
- क्रिस्टी और सेलर्न आता पुन्हा बाळासाठी तयारी करत आहे. रिपोर्ट्सनंतर आता क्रिस्टीला आई बनण्यात अडचण येणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...