Home | National | Other State | woman bled to death after husband with two friends gang raped her in jharkhand

प्रायव्हेट पार्टमध्ये खुपसले लाकडाचे तुकडे, पतीसह 2 मित्रांनी महिलेवर केला इतका पाशवी बलात्कार; रात्रभर रक्तस्राव, वेदनेने तळपून झाला मृत्यू

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 12:02 AM IST

मरण्यापूर्वी तिने पोलिसांना आपल्यावर बेतलेल्या अत्याचाराची हकीगत मांडली.

 • woman bled to death after husband with two friends gang raped her in jharkhand

  रांची - साता जन्माची साथ निभावण्याची शपथ घेऊन जिला घरी आणले तिच्यासोबत इतका पाशवी अत्याचार केला की ऐकूणही थरकाप उडेल. झारखंडमध्ये एका नराधमाने आपल्या पत्नीवर दोन मित्रांसोबत मिळून सामूहिक बलात्कार केला. यानंतरही त्यांचा अत्याचार संपला नाही. त्या सर्वांनी घटनास्थळी पडलेले लाकडांचे तुकडे आणि काठ्या तिच्या गुंप्तांगात खुपसल्या. दूर एका शेतातील निर्जन स्थळी हा अत्याचार सुरू असल्याने तिचे किंचाळणे कुणालाही ऐकू गेले नाही. रात्रभर ती रक्तस्राव आणि वेदनेने तळपत होती. शेतात भल्या पहाटे काही मजूर काम करण्यासाठी आले. त्यांनीच या महिलेचा आवाज ऐकूण घटनास्थळ गाठले. पोलिसांनी तिला रुग्णालयात नेताना चौकशी केली. परंतु, उपचार सुरू होताच तिचा मृत्यू झाला.


  ही घटना जामताडा जिल्ह्यातील नारायणपूर परिसरातील घडली आहे. येथे राहणारी एक महिला महाकाली पूजा निमित्ताने बुधवारी संध्याकाळी जत्रा आणि संथाली यात्रा पाहण्यासाठी गेली होती. याचवेळी तिचा पती उमेश मरांडीने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने तिचे अपहरण केले. यानंतर शेतात नेऊन तिच्यावर आळी-पाळीने बलात्कार केला. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, महिला जत्रेला येणार यांची त्या सर्वांना पूर्वकल्पना होती. त्यानुसार, त्यांनी हा कट रचला होता. मरण्यापूर्वी तिने पोलिसांना आपल्यावर बेतलेल्या अत्याचाराची हकीगत मांडली. तिने आपल्या पतीसह दोन्ही आरोपींची नावे सुद्धा सांगितली आहेत.


  रात्रभर रक्तस्राव, वेदनेने तळपली...
  - नराधमांनी तिच्यावर इतका अत्याचार केला की तिच्या शरीराबाहेरच नव्हे, तर शरीरात सुद्धा रक्तस्राव झाला. बलात्कार करताना सैतानांनी तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिळेल त्या काठ्या आणि लाकडाचे तुकडे घातले. अत्याचार झाल्यानंतर ती 10 तास बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तोपर्यंत रक्तस्राव सुरूच होता. यानंतर सकाळी शुद्धीवर आली तेव्हा तिच्या वेदना आणि किंचाळणे ऐकूण मजुरांनी तिच्याकडे धाव घेतली. तिची अवस्था इतकी वाइट होती की तिला उठताही येत नव्हते.
  - महिलेवर उपचार आणि वैद्यकीय तपास करण्यासाठी 3 डॉक्टरांची टीम नेमण्यात आली. त्यांनी उपचार सुरू केला होता. परंतु, अतीरक्तस्राव आणि इंटरनल ब्लीडिंगमुळे तिचा जीव गेला. तिच्या शरीरावर आणि शरीरात सर्वत्र जखमाच-जखमा होत्या. मेडिकल टेस्टमध्ये तिच्यावर अमानुष सामूहिक बलात्कार झाल्याचे स्पष्ट होत आहे.


  पतीला अटक, दोघांचा शोध सुरू...
  घटनेनंतर पोलिसांना पीडितेच्या आरोपी पतीला अटक केली आहे. आरोपी उमेशची सध्या कसून पोलिस चौकशी होत असून त्याच्या मित्रांचा शोध घेतला जात आहे. पीडित महिलेला तीन मुले-मुली आहेत. ते सगळेच आपल्या आजीच्या घरी राहतात. 2012 मध्ये वाढत्या वादानंतर उमेशने पीडित महिलेला घरातून हकलून दिले. तेव्हापासूनच ती आपल्या मुला-मुलींसोबत माहेरी राहत होती. तरीही पतीने तिचा पाठलाग सोडला नाही.

Trending