आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार घेण्यासाठी तरुणीने छापल्या 11 लाखांच्या खोट्या नोटा, शोरुममध्ये गेल्यावर झाले असे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्लिन- जर्मनीच्या कॅसरस्लॉटर्नमध्ये एका तरुणीने कार खरेदी करण्यासाठी प्रिंटरमधून 15 हजार यूरो (11 लाख रुपये)च्या नोटा छापल्या. पोलिसांनी तिला अटक केले आहे. तिला या गुन्ह्यात आता एका वर्षांचा तुरुंगावसही होऊ शकतो. पोलिसांनी तिच्या घरातून प्रिंटर आणि 3000 यूरो(अडीच लाख रुपये) च्या नोटा जप्त केल्या आहेत. 


कार शोरूमच्या मॅनेजरने सांगितले की, महिला एक दिवस आधी कार पंसत करुन गेली होती. दुसऱ्या दिवशी आल्यावर तिने टेस्ट ड्राइव्ह घेतली आणि 15 हजार यूरो दिले. त्यानंतर कर्मचारी नोटा मोजत असताना त्या नोटा खोटे असल्याचे त्याच्या लक्षात आले. प्रिंटरची इंक नोटांवर पसरलेली दिसत होती. 


तरुणीला खोट्या नोटांची माहिती नव्हती
जर्मनी पोलिसांनी सांगितले की, "20 वर्षीय तरुणीला या गुन्ह्यात एक वर्षांची शिक्षा होऊ शकते. या क्षेत्रातील जानकार गुन्हेगार नोट छापण्यासाठी चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर करतात, पण तरुणीला याबद्दल काहीच माहिती नसल्याने तिने प्रिंटरमधून नोटा छापल्या."