Home | Khabrein Jara Hat Ke | woman bought 30 lottery tickets every ticket turns winning

महिलेने विकत घेतली लॉटरीची 30 तिकिटे, सर्वच तिकीटांना लागले बक्षीस, एका झटक्यात बनली कोट्यधीश

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 11, 2019, 03:01 PM IST

लोकांची लॉटरी लागते, पण या महिलेची लॉटरीतही लॉटरी लागली

  • woman bought 30 lottery tickets every ticket turns winning

    वॉशिंग्टन - चमत्कार काय असतो याचा प्रत्यक्ष अनुभव अमेरिकेतील एका महिलेला आला. तिने लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. एका तिकीटावर लॉटरी लागणार नाही म्हणून आणखी एक घेऊन पाहून असे तिला वाटले. आणि पाहता-पाहता तिने एकाचवेळी त्या ठिकाणावरून लॉटरीची तिकिटे विकत घेतली. निकालाच्या दिवशी जेव्हा तिने आपल्या तिकीटांचे नंबर चेक केले तेव्हा तिला आपल्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास बसेनाशे झाले. तिने जेवढी तिकिटे खरेदी केली होती त्या सर्वच तिकीटांवर बक्षीस लागले. माध्यमांशी संवाद साधताना महिलेने सांगितले, की एकानंतर एक प्रत्येक तिकीटावर बक्षीस लागत असल्याचे पाहून मला आनंदाने हार्ट अटॅक येईल अशी भीती वाटत होती...


    एकाच दिवशी लागल्या 30 लॉटरी...
    व्हर्जिनिया प्रांतात राहणाऱ्या डेबोराह ब्राउन नावाच्या या महिलेने फेब्रुवारीच्या सुरुवातीला व्हर्जिनिया लॉटरीत आपले नशीब आजमावत एक तिकीट विकत घेतले. एकावर बक्षीस लागणार नाही म्हणून चक्क 20 तिकीटे खरेदी केल्या. लॉटरीचे निकाल 11 फेब्रुवारीला लागणार होते. त्याच दिवशी तिच्या मनात शंका आली आणि ती पुन्हा त्याच दुकानावर जाऊन आणखी 10 तिकिटे घरी घेऊन गेली. आता तिच्याकडे एकूणच 30 तिकीट झाले होते. जवळपास ही सर्वच तिकीटे 1-0-3-1 या कॉम्बिनेशनच्या होत्या. 11 फेब्रुवारीच्या रात्री निकाल समोर आले आणि जे घडले ते चमत्कारच... तिच्या प्रत्येक तिकीटावर 3-3 लाख रुपयांचे बक्षीस आले होते. अशा पद्धतीने तिने एकूणच जवळपास 1 कोटी रुपये जिंकले. लोकांना लॉटरी लागल्याचे आपण पाहिलाच असाल. परंतु, लॉटरीतही लॉटरी लागण्याची ही एक दुर्मिळ घटना ठरली आहे.

Trending