आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेच्या फोनवर गप्पा सुरू, इकडे डाॅक्टरांची 45 मिनिटांत ब्रेन सर्जरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - राजस्थानात ३५ वर्षे वयाची महिला आपल्या मेंदूवरील शस्त्रक्रिया सुरू असताना सुमारे ४५ मिनिटे फोनवर बोलत होती. यादरम्यान डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नांनाही तिने उत्तरे दिली. जयपूर येथील महात्मा गांधी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले, महिलेच्या मेंदूवर अशा जागी ट्यूमर झालेले होते, जेथून बोलण्याची प्रक्रिया नियंत्रित होते. यामुळे शरीराचा उजवा भाग हालचाल करतो. ही शस्त्रक्रिया रुग्ण जागा असेल तरच केली जाते. टोंक येथील शांतीदेवी यांना बोलण्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. शांतीदेवींना ब्रेन ट्यूमर असल्याचे डॉक्टरांना समजले.  


त्या शुद्धीवर असताना शस्त्रक्रिया करण्यामागे डॉक्टरांचाही एक हेतू होता. कारण शस्त्रक्रियेदरम्यान बोलण्याच्या एखाद्या भागाला काही धक्का तर बसत नाही ना? याची तपासणी करायची होती. जर काही परिणाम होत असेल तर शस्त्रक्रियेदरम्यानच तो दुरुस्त करणे शक्य होते. साधारणत: सर्जरीपूर्वी रुग्णाला बेशुद्ध केले जाते. परंतु ही शस्त्रक्रिया थोडी वेगळी होती. यात रुग्ण जागा होता.  डाॅक्टरांनी तिला फोनवर बोलण्यातच व्यग्र ठेवले.


न्यूरोसर्जन डॉ. पंकज गुप्ता यांनी सांगितले, सर्जरीपूर्वी दोन दिवस महिलेचे समुपदेशन करण्यात आले. तिला उपचारांची सर्व माहिती देण्यात आली. या महिलेचा निर्णय पक्का असल्याने तिने धाडसाने व आत्मविश्वासाने डाॅक्टरांशी संवाद साधला.

बातम्या आणखी आहेत...