Home | International | Other Country | woman brings home bomb thinking it was a potato

Shocking: बटाटा समजून रस्त्यावरून घरी आणली ही वस्तू, मग बोलवावे लागले बॉम्ब तज्ज्ञ

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 28, 2018, 10:29 AM IST

टॅरीने सांगितले, मी ती गोष्ट माझ्या बॅगमध्ये ठेवली आणि विचार केला की घरी जाऊन पाहील की हे नेमके काय आहे.

  • woman brings home bomb thinking it was a potato

    लंडन - ब्रिटनच्या नॉटिंघम येथील एका महिलेला तिच्या घराजवळ एक वस्तु मिळाली आणि ती बटाटा समजून ती घरी घेऊन आली. 30 वर्षीय टॅरी जेड तिच्या कुत्र्याला फिरवायला घेऊन गेली तेव्हा तिच्या कुत्र्याने जमीन खोदून ती वस्तु शोधून काढली आणि जमिनीतून निघालेली ही वस्तु बटाटा आहे असे तिला वाटले. पण जेव्हा सत्य समोर आले तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली... टॅरीने सांगितले, मी ती गोष्ट माझ्या बॅगमध्ये ठेवली आणि विचार केला की घरी जाऊन पाहील की हे नेमके काय आहे. यानंतर मी अंघोळीसाठी गेले. यादरम्यान माझा बॉयफ्रेंड मार्कची नजर त्यावर पडली आणि तो घाबरुन ओरडू लागला. ते एक ग्रेनेड होते. सत्य समजल्यावर लगेचच नॉटीघम पोलिसांना फोन केला.


    तो होता प्रॅक्टीस बॉम्ब...
    तपासणीसाठी गेलेल्या पोलिसाने सर्वप्रथम एरीया सील केला त्यानंतर त्या ग्रेनेडची तपासणी केली हेली. त्यात कळाले की तो एक प्रॅक्टीस बॉम्ब आहे. यानंतर आर्मीच्या बॉम्ब डिस्पोजल एक्सपर्टने ताब्यात घेतले. टॅरीने सांगितले की, मी मुर्खपणा केला आणि रस्त्यावर पडलेली वस्तु घरी घेऊन आली.माझ्या एका चुकीमुळे माझ्या कुटुंबियाचे आणि शेजाऱ्यांचा जीव गेला असता. पोलिसांनी सांगितले की या बॉम्बमध्ये फार कमी प्रमाणात बारुद असते.

Trending