आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किराया घेण्यासाठी आला घरमालक, घरातील खोदकाम पाहून विचारले कारण, 30 वर्षीय युवतीने जे उत्तर दिले, ते ऐकून बसला धक्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- स्वरूप नगर परिसरात 60 वर्षीय व्यक्तीसोबत रिलेशनमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय युवतीने फेब्रुवारीत आपल्या पार्टनरचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह दोन भागात कापून घरामागे गाडले. बुधवारी घरमालक घर भाडे घेण्यासाठी आला तेव्हा गार्डनमध्ये खोदकाम केलेले पाहून प्रश्न विचारले. तेव्हा युवतीने जे उत्तर दिले ते ऐकून घरमालकाने लगेच पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सडलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढला. 

 


फॅक्टरीत करत होते काम
- पोलिसांनी सांगितले, 30 वर्षीय सुनीता आणि 60 वर्षीय राजेश लिव्हइनमध्ये अमृत विहारच्या सी ब्लॉकमध्ये अंदाजे 8 वर्षांपासून राहत होते. 
- राजेश आधी सुनीताच्या आईसोबत लिव्हइनमध्ये राहेत होता. त्यानंतर तिच्या आईला झारखंडला पाठवून सुनीतासोबत राहू लागला, त्या दोघांचा एक 8 वर्षांचा मुलगादेखील आहे. ते दोघे एका फॅक्टरीत काम करत होते.

 


14 फेब्रुवारीपासून गायब होता राजेश
- पोलिसांनी सांगितले की, 14 फेब्रुवारीपासून राजेश घरातून गायब होता. बुधवारी घरमालक किराया घेण्यासाठी आला तेव्हा त्याने घरामागे गार्डनमध्ये खोदकाम केलेले पाहिले. त्यानंतर कारण विचारल्यावर सुनीताने सगळा प्रकार सांगितला आणि घरमालकाने लगेच पोलिसांना फोन केला.


 

बातम्या आणखी आहेत...