Home | Maharashtra | Mumbai | woman carries snake to help doctors to choose anti venom in mumbai

सर्पदंश : माय-लेकीचा सापाने घेतला चावा; त्याच जिवंत सापाला घेऊन पोहोचल्या रुग्णालयात

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 09, 2019, 02:24 PM IST

डॉक्टरांना मदत व्हावी यासाठी सापाला घेऊन आल्या रूग्णालयात

 • woman carries snake to help doctors to choose anti venom in mumbai

  मुंबई - धारावीतील सोनेरी चाळीत राहणाऱ्या महिल्या आणि तिच्या मुलीला रविवारी सापाने दंश केला. महिला उपचारासाठी आपल्या मुलीला घेऊन तत्काळ सायन रुग्णालयात गेली. ज्या सापाने त्यांना चावा घेतला तोच साप घेऊन दोघी मायलेकी रूग्णालयात दाखल झाले. सदरील प्रकार पाहून तेथील डॉक्टर हैराण झाले. डॉक्टरांना विषरोधी इंजेक्‍शन मिळण्यास मदत मिळेल या अपेक्षेने मायलेकींनी असे केले.


  सुल्‍ताना खान (34 वर्ष) यांनी मुंबई मिररला सांगितल्यानुसार, रविवारी सकाळी 11 वाजेदरम्यान तहसीन (18 वर्षे) आणि घरातील इतर लोक नाश्ता करत असताना साप घरात आला आणि तहसीनच्या हाताला दंश केला. मी तत्काळ सापाला तिच्या हातावरून ओढले. पण या दरम्यान सापाने माझ्या बोटांना चावा घेतला.

  डॉक्टरांना मदत व्हावी यासाठी सापाला आणले रुग्णालयात
  यानंतर सुल्‍तानाने सापाला सोडले नाही. टॅक्सी बोलावून आपल्या मुलीसोबत थेट रुग्णालयात दाखल झाली. एकदा सुल्‍तानाच्या एका नातेवाईकाला सापाने दंश केले होते. त्यावेळ उपचार करणारे डॉक्टर म्हणाले की, कोणत्या सापाने दंश केला हे माहीत असते तर अँटी-वेनम शोधण्यास मदत झाली असती. ही घटना सुल्‍ताना म्हणाली की, ही घटना माझ्या लक्षात होती. कोणत्या सापाने चावा घेतला हे सांगण्यात वेळ जाऊ नये आणि डॉक्टरांना अँटी-वेनम निवडण्यात मदत व्हावी यासाठी मी सापाला पकडून रुग्णालयात घेऊन आले.


  असे करण्याची आवश्यकता नाही
  सायन हॉस्पिटलचे डीन इंचार्ज डॉ. प्रमोद इंगळे म्हणाले की, असे करण्याची काही गरज नव्हती. साप कोणताही असला तरी त्यावरी उपचार एकसमान असतो. सध्या सर्व प्रकारच्या सापाच्या दंशावर काम करणारे एक युनिव्हर्सल अँटी-वेनम इंजेक्‍शन उपलब्ध आहे. आई आणि मुलगी दोघींना अँटी-वेनमचे चार इंजेक्‍शन देण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते आमच्या निगराणीखाली आहेत.


  अशी जोखीम घेणे धोकादायक
  सापाला रुग्णालयात आणण्याबाबत डॉ.इंगळ म्हणतात. की, अशाप्रकारे एखाद्या सापाला आणणे धोकादायक ठरू शकते. कोणीही अशाप्रकारची जोखीम घेऊ नये.

  सुल्‍तानाने सांगतले की, सापाने चावा घेतल्यानंतर तहसीनचा हातावर सुज आली होती. तिचा डावाहा पूर्णपण सुन्न पडला होता. उपचारादरम्यान तिला दोन वेळेस उलटी झाली होती. साप पूर्णपणे स्वस्थ असून त्याला पशू अधिकार कार्यकर्यांकडे सुपुर्त करण्यात आले आहे.

Trending