आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेसोबत संबंध ठेवण्यास नकार देत होता पूर्वाश्रमीचा प्रियकर...तिने त्याला घरी बोलवले..वायग्रा खाऊ घातले आणि कापले प्रायव्हेट पार्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाणा - अनैतिक संबंध किती घातक ठरू शकतात याचे उदाहरण पंजाबच्या लुधियाणा शहरात नुकतेच घडलेल्या एका घटनेवरून घेता येईल. येथे एका महिलेने विवाहित असतानाही एका तरुणासोबत अनैतिक शारीरिक संबंध ठेवले. एवढेच नव्हे, तर त्याला सोडण्यासही ती तयार नव्हती. याच रागात तिने आपल्या मित्रांसोबत मिळून अविवाहित प्रियकराचा चक्क प्रायव्हेट पार्ट कापला. याचवर्षी मे महिन्यात घडलेल्या या घटनेत तिला अटकही करण्यात आली. पीडित युवकाच्या कुटुंबियांना यासंदर्भातील माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्यांचा मुलगा बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी कंगनवाल येथे राहणारी पम्मी वर्मा आणि तिच्या 5 सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

 

लग्नासाठी दबाव टाकत होती आरोपी विवाहिता...
> पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवक एका खासगी कंपनीत नोकरी करतो. काही वर्षांपूर्वी आरोपी पम्मी आणि तो बिहारमध्ये राहत होते. दोघे शेजारीच असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यात प्रेम संबंध होते. काही कारणास्तव दोघांचे लग्न होऊ शकले नाही. तसेच पम्मीच्या कुटुंबियांनी तिचे लग्न लुधियाणातील दुसऱ्याच एका व्यक्तीसोबत केला. तेव्हापासूनच ती लुधियाणात राहत होती. यानंतर दोघांचे अफेअर सुरूच होते.
> पीडित युवकाने आपल्या विवाहित प्रेयसीचा पत्ता शोधून काढला आणि तिच्या पतीच्या शेजारीच राहायला आला. पम्मीने नर्सिंगचा डिप्लोमा केला होता. त्यामुळे, ती एका रुग्णालयात नोकरी करत होती. पीडित युवकाने सांगितल्याप्रमाणे, पम्मी गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. हे दोघे दररोज भेटायचे आणि प्रत्येकवेळा ती लग्नाची मागणी करत होती. पण, विवाहित प्रेयसीसोबत लग्न करण्यास युवकाने नकार दिला.


शक्तीवर्धक औषधीच्या नावाने भूल...
त्यानंतर गुरुवारी पम्मीने घरात कुणीच नसल्याचे सांगत आपल्या प्रियकराला घरी बोलावले. तसेच शक्तीवर्धक औषध म्हणून भूलचे औषध दिले. युवक बेशुद्ध झाल्याचे पाहता तिने आपल्या 5 सहकाऱ्यांसोबत मिळून त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. तसेच त्याला तशा अवस्थेत सोडून घटनास्थळावरून पसार झाली. पोलिसांनी पम्मी आणि तिच्या मित्रांवर भा.द.वि. कलम 326, 328, 342 अंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू आहे. तर दुसरीकडे, पीडित युवकावर शस्त्रक्रिया झाली. परंतु, तो अजुनही पूर्णपणे बरा झालेला नाही.

बातम्या आणखी आहेत...