आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या रात्रीच प्रियकराशी ठेवले संबंध, सकाळ होताच तरुणीच्या शरीरात झाला भीतिदायक बदल, पाहून हादरला बॉयफ्रेंड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - रशियाच्या नोवोसिबिर्स्क शहरात कोर्टाने एका तरुणीला आपल्या प्रियकरावर चाकूने वार केल्याच्या गुन्ह्यात अडीच वर्षै कैदेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच तरुणीला तब्बला साडेतीन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. ही घटना फेब्रुवारी महिन्यातील आहे, तरुणीने पहिल्याच भेटीत आपल्या प्रियकरासोबत असे कृत्य केले होते.


सकाळ होताच तरुणीमध्ये झाला भीतिदायक बदल
रशियाच्या नोवोसिबिर्स्क शहरात राहणाऱ्या 22 वर्षीय Tirskaya ची सोशल मीडियावर एका तरुणाशी मैत्री झाली होती. चॅटिंगमधून दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. सगळे ठीक सुरू होते, परंतु ती सकाळ तरुणाला एखाद्या भयंकर स्वप्नासारखी ठरली. आदली रात्र दोघांनी एकाच बेडवर रात्र घालवली होती. अचानक Tirskayaचे हावभाव बदलले. ती आपल्या प्रियकराला म्हणाली की, ती टीव्ही मालिका व्हॅम्पायर डायरीजची अॅक्ट्रेस एलेना गिल्बर्टसारखी एक व्हॅम्पायर आहे आणि आता त्याला मरावे लागेल.

 

बाथरूममधून निघताच छातीवर चाकूने केले वार
आपल्या प्रेयसीचे हे बोलणे ऐकून मुलगा खूप घाबरला आणि घरी जाऊ देण्यासाठी गयावया करू लागला. उसने अवसान आणून तो तिला भुताटकीवर विश्वास नसल्याचे म्हणाला. यानंतर तो बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेला. पण बाहेर निघताच Tirskayaने त्याच्या छातीवर चाकूने वार केले. तिने अनेक वार केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. तो आरडाओरड करतच मदतीसाठी बाहेर पळाला.

 

कोर्टाने सुनावली शिक्षा
घराबाहेर पळून जाताच लोकांनी त्याला सावरून रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी मुलाची प्रकृती चिंताजनक होती, परंतु डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून त्याला वाचवले. याप्रकरणी कोर्टाने Tirskayaला दोषी ठरवलत अडीच वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली. याशिवाय तब्बल साडेतीन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...  

   

बातम्या आणखी आहेत...