आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG! टाईम ट्रॅव्हलने भविष्यातून आलेल्या महिलेने सांगितल्या अशा घटना, ऐकून उडेल थरकाप...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिनलंड- फिंनलंडमध्ये राहणाऱ्या महिलेने एक अजब दावा केला आहे. या महिलेचे नाव क्लोई असून तिने दावा केला आहे की, ती टाईम ट्रॅव्हल करून वर्षे 6,000 या कालखंडात जाऊन परत आली. तिने सांगितल्यानुसार, तिच्या दाव्याला सिद्ध करण्यासाठी तिच्याकडे एक विचित्र वस्तु आहे. तिने दावा केला आहे की, भविष्यात 4,529 या वर्षांमध्ये डायनासोर परत पृथ्वीवर येतील. त्यांना प्राणीसंग्रहालयात ठेवले असून त्यांना आपण  जेवढे धोकादायक समजतो तेवढे ते अजिबात नाही.

 

टाईम ट्रॅव्हल मशिनमध्ये सवार होऊन  हजारो वर्षेमागे पोहचली क्लोई

> क्लोईने सांगितले की, 'टाईम ट्रॅव्हल मशीन'मध्ये जाण्यासाठी तिला भिती वाटत होती. अखेर ती टाईम ट्रॅव्हल करण्यासाठी तयार झाली. तिला एका खुर्चीवर बसवले त्यानंतर खुर्चीवर तिच्या हातांना आणि पायांना फिक्स करण्यात आले. तिच्या डोक्यावर एक धातूची ट्यूब लावली. त्यानंतर तिच्या शरीरातून एक विद्युत प्रवाह प्रवाहीत करण्यात आला.  क्लोईने सांगितले की, 'यानंतर मी बेशुद्ध झाले आणि जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी रस्त्याच्या मधोमध पडलेली होते. मी वर्षे 6,000 या कालखंडात पोहचले होते. टाईम ट्रॅव्हल करताना तिथे गगनचुंबी इमारती आणि आजुबाजूचा परिसर फुलांनी आणि झाडांनी बहरलेला होता. तिथे अनेक प्रकारचे प्राणी होते. तिथे एक प्राचीन झाड होते आणि त्या झाडाचे नाव रोकलोरुलो होते. त्या झाडाला वर्ष 6,000 मध्ये पुनर्जीवित केले असून ते झाड कोट्यावधी वर्षांपूर्वी डायनासोरांचे मुख्य आहार होते.'

 

वर्ष 2,300 च्या सुरूवातीला पृथ्वीवर पोलिस, सुरक्षारक्षक असे कोणतेच कर्मचारी नसणार

> क्लोईने सांगितल्यानुसार, तिथे सर्व ठिकाणी इलेक्ट्रिक करंट होते. तिथे प्रदुषण करणाऱ्या कोणत्याच गोष्टी नव्हत्या. जसे की गॅस, पेट्रोल आणि असे पदार्थ ज्यांनी वातावरण प्रदूषित होते. भविष्याविषयी सांगताना तिने सांगितले की, वर्ष 2,300 च्या सुरूवातीला पृथ्वीवर पोलिस, सुरक्षारक्षक असे कोणतेच कर्मचारी नसणार आहे कारण तिथे जन्मताच लोकांच्या डोळ्यामध्ये चिप लावले जाईल, जेणेकरून काही क्षणातच गुन्हेगारांचा खुलासा करता येईल.

बातम्या आणखी आहेत...