Home | National | Other State | Woman cleaner beats a congress leader in Panvtasahib after molestation

रूग्णालयात साफ-सफाई करणाऱ्या महिलेची केली छेडछाड, त्यानंतर महिलेने भररस्त्यात काँग्रेस नेत्याला चपलीने दिला चोप

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 17, 2019, 12:23 PM IST

डॉक्टर-कर्मचाऱ्यांनीदेखील हात साफ केला, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल


  • पांवटा साहिब(हिमाचल प्रदेश)- येथील एक काँग्रेस नेते आणि किरतपूरचे नंबरदारला पांवटा साहिब सिव्हील हॉस्पीटलमध्ये सफाई कर्मचारी महिलेने चांगलाच चोप दिला. या मारहाणीदरम्यान जेव्हा डॉक्टरांना आणि हॉस्टीटलच्या कर्मचाऱ्यांना छेडछाड झाल्याचे कळाले, तेव्हा त्यांनीही हात साफ करून घेतला. त्यानंतर रूग्णालयातील पोलिसांनी आरोपीला त्यांच्या तावडीतून सोडवले आणि ताब्यात घेतले.


    आरोपीने पकडला महिलेचा हात
    आरोपीविरूद्ध छेडछाडचा गुन्हा दाखल झाला आहे. तर रूग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरात लागलेल्या या चपलीने मारल्याचा व्हिडिओ कैद झाला आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारत पीडित कर्मचारी शीला यांनी सांगितले की, त्या जेव्हा सफाई करत होत्या, तेव्हा आरोपी जमालुदीन आला. त्यानंतर त्याने तू नीट सफाई करत नाहीस असे म्हणत त्याने हात पकडला आणि छेडछाड केली. त्यानंतर भडकलेल्या महिलेने चपलीने त्याला चांगलाच चोप दिला.

Trending