आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीव धोक्यात घालून महिलेने मारली सिंहाच्या पिंजऱ्यात उडी, नंतर झाले असे...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील ब्रोंक्स प्राणी संग्रहालयात एक महिला सिंहाच्या पिंजऱ्यात उतरली. त्या वेळेस तिच्यासमोर एक आफ्रिकन सिंह आला. प्राणी संग्रहालयाचे काही नियम असतात, महिलेने नियम मोडून आत गेल्याने तिचा जीव जाऊ शकत होता.

महिलेचा जीव जाऊ शकत होता
प्राणी संग्रहालयाच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, महिलेने संग्रहालयाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. या कृत्यामुळे महिला गंभीर जखमी होऊ शकत होती किंवा तिचा जीवही जाऊ शकत होता. व्हिडिओत दिसत आहे की, महिला सिंहाच्या पिंजऱ्यात उतरली. यावेळी ती थोडीसुद्ध घाबरलेली दिसत नाहीये. यावेळी आफ्रिकन सिंह तिच्या समोर येतो आणि तिच्या जवळ येऊ लागतो. न्यूयॉर्क पोलिस डिटेक्टिव सोफिया मेसनने सांगितले की, कोणीतरी 911 वर फोन केला नाही. यावेळी कोणालाही अटक झाली नाहीये. पोलिस विभागाला याबद्दल मंगळवारी सूचना मिळाली. त्यामुळे पोलिसांकडे याबाबत काहीच माहिती नाहीये. सध्या महिलेवर ब्रोंक्स प्राणी संग्रहालयाने केस दाखल केलेला नाहीये. दरम्यान, ती महिला पिंजऱ्यात कशी पोहचली हे अजून कळालं नाहीये.

बातम्या आणखी आहेत...