आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुसाइड नोटमध्ये, मी हेमंतशिवाय जगू शकत नाही.. लिहून महिलेने दिराच्या गनने केली आत्महत्या.. हे होते कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत - रांदेर पोलिस लाइन बिल्डींगमध्ये सब इन्सपेक्टर भरत प्रधान यांची वहिणी स्मिताने मंगळवारी त्यांच्याच सर्व्हीस रिव्हॉल्वरने गोळी झाडून घेत आत्महत्या केली. घटनेच्या वेळी कुटुंबातील अनेक लोक ब्रह्माकुमारीच्या सत्संग कार्यक्रमात गेले होते. तर सासरे घराबाहेर पेपर वाचत बसले होते. पोलिसांना मिळालेल्या सुसाइडनोटमध्ये मराठीत लिहिले होते, मी हेमंतशिवाय जगू शकत नाही. मला माफ करा. मृत स्मिता पतीच्या मृत्यूमुळे डिप्रेशनमध्ये होत्या. त्यांना दोन मुले आहेत. 


बाहेर बसलेल्या सासऱ्यांनी ऐकला आवाज 
घरातील सदस्य सकाळी 8.30 वाजता ब्रह्मकुमारीच्या सत्संगासाठी तर स्मिता यांचा मोठा मुलगा शाळेत गेला होता. स्मिताने बेडरूमचा दरवाजा बंद करून स्वतःला गोळी मारून घेतली. गोळीचा आवाज ऐकूण सासरे शेजाऱ्यांना घेऊन आले  आणि दार तोडले तेव्हा स्मिता आमत मृतावस्थेत होती. 


खूप समजावले पण फायदा नाही 
पोलिस सब इन्सपेक्टर भरत प्रधानने सांगितले की, मी वहिणीला खूप समाजवले. भाऊ गेल्यानंतर सर्व जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार होतो. पण तरीही त्या कायम तणावात राहायच्या. वर्षभरापूर्वी स्मिता यांच्या पतीचे आजारपणामुळे निधन झाले होते. तेव्हापासून त्या डिप्रेशनमध्ये होत्या. त्या डिप्रेशनच्या गोळ्याही खात होत्या असे पोलिसांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...