आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या 15 वर्षानंतर महिलेने केली आत्महत्या, महिला MA पास पण लग्न झाले 10 वी पास व्यक्तीसोबत, मुलांसाठी लिहीला संदेश- 'सगळ्या अडचणींसाठी एकच उत्तर आहे..'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बिलासपूर(छत्तीसगड)- एन.सी.सी. मध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानीत आणि युनिव्हर्सिटी टॉपर राहिलेल्या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मुलांच्या नावे एक संदेश लिहीला आहे. त्यात तिने लिहीले की, 'शिक्षणाशिवाय या जगात सगळ काही अपुर्ण आहे. गरिबी आणि इतर सर्व अडचणींना उपास फक्त शिक्षण आहे. तुम्हीजर खूप शिकलात तरच अडचणींचा सामना करू शकता.' तोरवा परिसरातील आभा मौर्य(37) यांनी बुधवारी सकाळी आर्थिक तंगी असल्यामुळ राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.


महिलेचे मामा के.के. सिन्हा यांनी सांगितले, आभाचे एम.ए.पर्यंतचे शिक्षण झाल्यावर, तिला नोकरी करायची होती. पण घरच्यांनी 10 वी पास युवकासोबत तिचे लग्न लावून दिले. सासरी गेल्यावर पतीच्या आर्थिक परिस्थितीची तिला जाणीव झाली. घरात पतीचे काहीच चालत नव्हते, तिला बाहेर पडून काहीतरी करायचे होते, पण सासरकडच्या लोकांनी तिला काहीच करू दिले नाही. काही काळानंतर दोन मुले झाली आणि खर्च वाढला, त्यांच्या शिक्षणासाठी आणि इतर गोष्टींसाठी खर्च व्हायचा. मुलांच्या शिक्षणासाठी आभाची आई आणि काका मदत करायचे, तिला त्यांच्याकडून मदत घेताना खूप दुख: व्हायचे. तिला कोणावरच डिपेंड राहायचे नव्हते, जेव्हा ती माहेरी यायची, नेहमी म्हणायची, मला त्यावेळेस माझ्या पायावर का उभे राहू दिल नाही. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्या मुलांना शिक्षण घेण्याचा सल्ला दिला.