आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाहेर रामायण पाठ करत होत्या सासू, आत सुनेने केले असे काम, मुलांच्या रडण्याने झाला खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीकर - राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात एका सुनेने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. तत्पूर्वी विवाहितेने किचनमध्ये काम केले. दूध तापवून ते मुलालाही पाजले. यानंतर त्याला ती बेडरुममध्ये घेऊन गेली. त्याच रुमची कडी आतून लावून तिने आपल्या साडीचा गळफास केला आणि टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्या केली तेव्हा तिचा पती घरात नव्हता. या प्रकरणी आत्महत्येची नोंद करण्यात आली असून तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. 


बेडवर मुलाला बसवून फासाला लटकली आई...
> पीडितेच्या सासूने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची सून शिल्पा किचनमध्ये होती तेव्हा त्यांनी रामायण पाठ सुरू केला होता. सासूसमोरच सुनेने आपल्या बाळाला दूध पाजले आणि खोलीत घेऊन गेली. काही वेळातच मुलाच्या रडण्याचा आवाज आला. सुरुवातीला सासूंनी त्याची आई तेथेच असल्याचे समजून दुर्लक्ष केले. परंतु, मुलाचे रडणे काही थांबलेच नाही. रुममध्ये जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा दार आतून बंद होते. खिडकीतून पाहिले तेव्हा सासूबाईंची भांबेरीच उडाली.
> आतील दृश्य पाहताच सासूंनी घरातील सर्वांना गोळा केले. दीर आणि सासऱ्यांनी दार तोडून आत प्रवेश केला. तिला फासावरून खाली उतरवले तेव्हा शिल्पा श्वास घेत होती. सर्वांनी मिळून उपचारासाठी रुग्णालय गाठले. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 
> शिल्पा मूळची कोलकाता येथील रहिवासी आहे. काही वर्षांपूर्वीच तिचा विवाह राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील राहुलसोबत करण्यात आला. ही घटना घडली त्यावेळी पती राहुल जयपूरला कामानिमित्त गेला होता. राहुलच्या आई आणि कुटुंबियांनी कोलकात्यात शिल्पाच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली. शिल्पाला आई-वडील नाहीत. ती कोलकात्यात आपल्या काकांसोबत राहत होती. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही.

बातम्या आणखी आहेत...