आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकराने प्रेमसंबंधांस नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या; बॉयफ्रेंडसह मैत्रिणीवर गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जुन्या नाशकातील काेळीवाडा येथे राहणाऱ्या तरुणीशी प्रेमसंबंध ठेवणाऱ्या प्रियकराने तिला विवाहास नकार देत दुसऱ्याच मुलीसाेबत संबंध ठेवल्याच्या वादातून तरुणीने राहत्या घरी गळफास घेत अात्महत्या केल्याचे उघड झाले अाहे. मृत तरुणीने संशयित प्रियकराने केलेल्या प्रेमभंगामुळेच अात्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली असल्याने त्याच्याविरुद्ध भद्रकाली पाेलिस ठाण्यात अात्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 

रविवारी (दि. ३) प्रियंका पवार (१८) या तरुणीने अात्महत्या केली हाेती. तरुणीच्या मृतदेहाजवळच अात्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी अाढळून अाली अाहे. या चिठ्ठीत तिने उमेश शिवाजी पिंगळे (रा. कोळीवाडा) आणि त्याच्या प्रेयसीमुळेच अात्महत्या करीत असल्याचा मजूकर लिहिलेला अाहे. 'पिंगळे याच्याशी प्रेमसंबंध असताना त्याने मला धाेका देत दुसऱ्याच तरुणीशी प्रेमसंबंध ठेवले असून दाेघांनी माझी फसवणूक केली अाहे', अशा अाशयाचे मजकूर लिहिला अाहे. ही चिठ्ठी तरुणीच्या वडिलांनी भद्रकाली पाेलिसांकडे दिली असता पाेलिसांनी चिठ्ठीच्या अाधारे प्रियकर उमेश पिंगळे याच्यासह त्याच्या मैत्रिणीविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

 

बातम्या आणखी आहेत...