आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या नकारामुळे दुखी झालेल्या महिलेने केली आत्महत्या, मृत्युपूर्वी कुटुंबीयांना केला फोन...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिलासपुर- आजीच्या तेराव्याला जाऊ दिले नाही म्हणून महिलेने आत्महत्या करून घेतली आहे. पण महिलेचा मृतदेह ज्या परिस्थीत मिळाला ते पाहून आत्महत्या आहे असे वाटत नाही. घटना दुपारी 1 ची आहे पण नवरा 4 वाजता घरी आला आणि तेव्हा त्याला घरातील दृष्य दिसले, त्यानंतर त्याने फोन करून महिलेच्या माहेरच्या लोकांना कळवले. महिलेच्या कुटुंबीय महिलेच्या घरी गेले पण पतीने त्यांना घरात घुसू दिले नाही, त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणानंतर महिलेच्या 3 वर्षांच्या मुलगाही गायब आहे.


अर्चना शर्मा असे मृत महिलेचे नाव तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत महिलेचा पती बालमुकुंद शर्मा तिथेच गुत्तेदारीचा व्यवसाय चालतो. दुपारी मुकुंद घरी आला तेव्हा त्याला बेडरूममध्ये गळफास घेतलेल्या पत्नीचा मृतदेह दिसला. दुपारी 4 वाजता त्याने सगळ्यांना घटनेची माहिती दिली. महिलेच्या घरचे मुकुंदच्या घरी गेल्यावर त्यानी त्यांना येउ दिले नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी सिव्हील लाइन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.


आत्महत्येपूर्वी कुटुंबीयांना केला फोन 
अर्चनाच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे, तर काही दिवसांपूर्वी तिच्या आजीचे निधन झाले होते आणि 8 जानेवारीला त्यांच्या तेराव्याचा कार्यक्रम होता, पण त्यातही तिला नाही जाता आले. त्यानंतर त्यांनी अर्चनाला विचारले की, तु तेराव्याला का नाही आली तेव्हा ती म्हणाली असच नाही आले. त्यानंतर त्यांनी मुकुंदला फोन केला पण त्याने फोन उचलला नाही असे अर्चनाच्या घरच्यांनी पोलिसांना सांगितले. या सगळ्यावरून पोविसांना वेगळाच संशय येत आहे.

 

मुलगा झाला गायब
अर्चना आणि मुकुंद यांना 3 वर्षांचा मुलगा आहे, पण अर्चनाच्या मृत्युपासून तो गायब आहे. त्याचा सगलीकडे शोध घेण्यात आला पण शोध लागला नाही. 

 

सामानामुळे वरात घेऊन गेले परत 
अर्चना यांचे लग्न 2004 मध्ये मुकुंद शर्मासोबत झाले होते. ज्या दिवशी लग्न होते त्या दिवशी कमी हुंडा मिळाल्याचे कारण सांगुन वरात परत घेऊन गेले होते. त्यानंतर समजुत घालुन लग्न केले गेले पण तेव्हापासून अर्चनाला त्रास दिला जाऊ लागला. इतकेच नाही तर काही दिवसानंतर मुकुंदने अर्चनाला तिच्या माहेरी सोडले आणि 8 वर्षानंतर समाजातील बैठकीनंतर परत घरात घेतले. 
 

बातम्या आणखी आहेत...