आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IAS ची तयारी करत असलेल्या मुलीने घरी येताच घेतला गळफास, भावाच्या नावाने लिहिली सुसाइड नोट, सांगितले का उचलले हे पाउल...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंगावली(मध्यप्रदेश)- आयएएसची तयारी करत असलेल्या शिक्षीकेला नेट परीक्षा क्वालीफाय न करता आल्यामुळे खुप डिप्रेशनमध्ये गेली आणि स्टोर रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी कुटुंबीयांना स्टोररूममध्ये तिचा मृतदेह दिसला आणि त्यासोबत एक सुसाइड नोट मिळाली जी तिने तिच्या भावासाठी लिहिली होती. त्यात आत्महत्येचे कारण परीक्षेत क्वालिफाय न होण्याचे लिहीले आहे.


रात्री सगळ्यांसोबत केले जेवण, नंतर घेतली फाशी
मल्हारगढ रोडवर राहणाऱ्या निरपाल यादव यांची बहिण करूणा सिंह उत्तरप्रदेशच्या उरईजवळील सरकारी शाळेत शिक्षिका होती. ती अभ्यासाथ हुशार होती, आणि दिल्लीतून आयएएसची तयारी करत होती. दोन दिवसांपूर्वी ती आपल्या घरी मुंगावलीला आली होती. शुक्रवारी आपल्या कुटुंबासोबत जेवण करून आपल्या रूममध्ये अभ्यासाला गेल. कुटुंबातील सगळे लोक झोपी गेल्यावर तिने स्टोर रूमच्या दाराला ओढनीने गळफास घेतला. सकाळी भाऊ उठला आणि त्याने पाहिले की, बहिणीने आत्महत्या केली आहे, नंतर त्याने इतर लोकांना माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...