आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 महिन्यांच्या बाळाला झोपवून नवऱ्याला लावला फोन, विचारले- कधी येत आहात, रात्री नवरा घरी आला आणि घरातले दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- अवधपुरी परिसरात एका नवविवाहीतने गळफास घेऊन आत्महत्या केली. गळफास घेण्याआधी ती तिच्या नवऱ्य़ाशी फोन वर बोलली होती. सासरच्या लोकांकडून कोणत्याही प्रकार समस्या नव्हती आणि सुसाईड नोटही सापडली नाहीये त्यामुळे आत्महत्या मागचे नेमके कारण समजु शकले नाहीये.

 

बीडीए रोड एसआरजी कँपसमध्ये राहणारी 21 वर्षीय प्रीति मिश्रा पति दिलीप मिश्रासोबत राहत होती. एस.आय. आर.के. प्रजापति यांनी सांगितले की, बुधवारी रात्री दिलीप आपला भाऊ आणि मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी बाहेर गेला होता. त्याने याबद्दल प्रितीला सांगितले होते. रात्री अंदाजे 11 वाजता प्रितीने दिलीपला फोन केला होता. त्याने तिला अर्ध्या तासात येतो म्हणला. रात्री 12 वाजता तो घरी गेला तेव्हा त्याने बेडरूममध्यो पाहिले की, प्रितीने गळफास घेतला आहे आणि खाली त्यांचे 11 महिन्यांचे बाळ झोपले आहे. त्याने तिला तत्काळ खासगी रूग्णालयात घेऊन गेला. त्यानंतर रूग्णालयाकडून पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. घटनास्थळावर पोलिसांना कोणतीसी सुसाईड नोट मिळाली नाहीये आणि प्रितीच्या माहेरच्या लोकांनीही कोणताच आरोप केला नाहीये त्यामुळे पोलिसांनी मृतदेह घरच्यांच्या स्वाधीन केला.

 

प्रितीच्या आवडिने तयार होत होते इंटीरिअर
तीन वर्षांपूर्वी दिलीप आणि प्रितीचे लग्न झाले होते. रात्री अंदाजे 9 वाजता तिचे तिच्या वडिलांसोबत फोनवर बोलने झाले, तेव्हा ती दुखी किंवा नाराज वाटत नव्हती. याआधी पण कधी तिने त्रास असल्याचे सांगितले नाही. तिच्या आवडिने दिलीप त्यांच्या घरात इंटेरिअरचे काम करत होता. असे प्रितीचे वडील म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...