आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 महिन्याच्या मुलासमोर आईची आत्महत्या, सुसाइड नोट मध्ये लिहिले-सासरचे सर्व चांगले, पतीचे दुसरे लग्न लावून द्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवास - एका फोनमुळे पतीशा वाद झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी येथील चाणक्यपुरीची 20 वर्षीय नवविवाहिता यमुना मालवीय हिने फाशी घेत आत्महत्या केली. घराच्या वरच्या मजल्यावर साडीचा फास बनवत तिने आत्महत्या केली. तिचे सुसाइड नोट आढळले. त्यात तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जात असल्याने ती दुःखी असल्याचे समोर येत आहे. पतीचे दुसरे लग्न लावून द्या असेही तिने पत्राल लिहिले आहे. 


एक महिन्याच्या मुलासमोर आत्महत्या 
गुरुवारी ही घटना घडली तेव्हा यमुनाचा पती आणि दोन वर्षांचा मुलगा तसेच कुटुंबातील इतर लोक अंगणात बसले होते. तर एक महिन्याचे बाळ महिलेच्या जवळ होते. वरच्या खोलीतून बराच वेळ बाळ रडण्याचा आवाज येत राहिला तेव्हा सासरे शंकरलाल पाहण्यासाठी गेले. बाहेरून आवाज दिला पण खोली उघडली नाही म्हणून त्यांनी खिडकीतून पाहिले तर आतील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी सर्वांना बोलावले. त्यानंतर सगळे आले आणि दार तोडून आत शिरले. तिला लगेचच हॉस्पिटलला नेण्यात आले, पण डॉक्टरांनी मृत घोषित केले. 


काय लिहिले सुसाइड नोटमध्ये.. 
या सुसाइड नोटमध्ये महिलेने लिहिले होते, मी यमुना उर्फ बेबी संपूर्ण शुद्धीत लिहितेय की, माझ्या सासरच्या लोकांनी मला त्रास दिलेला नाही. ते सर्व खूप चांगले आहेत. दीर, नणंदाही चांगल्या आहेत. मोठा मुलगा रियांश 2 वर्षांचा आणि छोटा रुद्रांश 1 महिन्याचा आहे. दोघांना माझ्या आईकडे सोडा. ते तिथेच मोठे होतील. माझे पती अनिल मालवीय यांनी माझ्या आईकडून 12 हजार रुपये घेतले होते. ते तिला परत मिळवून द्या. माझ्या रकमचेवर माझ्या मुलांचा अधिकार आहे. कोठीत गल्ला आहे. त्यात 150 रुपये आहेत. ते माझ्या आईने लहान मुलगा रुद्रांशला कपडे घेऊन देण्यासाठी दिले होते. ते पैसे त्यांना परत द्या. माझ्या चारित्र्यावर संशय घेऊ नका, मी चुकीची नाही. पती अनिलचे दुसरे लग्न लावून द्या. 


फोननंतर झाला होता वाद 
मावशी सुनिताने सांगितले की, बुधवारी सायंकाळी यमुनाला मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला होता. ती बोलत होती, तेव्हाच जावई आले. त्यांनी विचारले फोन कोणाचा होता, त्यावरून वाद झाला होता. मीही समजावण्यासाठी गेले होते. रात्री यमुना आईला म्हणाली होती, मला घेऊन जा. त्यावर आई म्हणाली होती, तुझे घर सासरच आहे, चांगली राहा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने फाशी घेतली. 


हो, फोन आला होता.. 
पति अनिलने सांगितले रात्री फोन आला होता, मी कोणाचा आहे असे विचारले. तसेच एक तर फोन वापरणे बंद कर अन्यथा ज्याने फोन केला त्याच्या विरोधात तक्रार दे असे मी म्हणालो होतो. सकाळी तिने फाशी घेतली. सुसाइड नोटमध्ये काय आहे हे मलाही माहिती नाही. 


हँडरायटिंग तपासणार 

महिलेने सुसाइड नोटम लिहिली असून ती पोलिसांनी जप्त केली आहे. तक्यात महिलेने सासरची मंडळी चांगली असल्याचे म्हटले आहे. आता तज्ज्ञ हस्ताक्षर तपासणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...