आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीन्स-टॉप परिधान करून मार्केटमध्ये फिरत असलेल्या पत्नीला पाहून पतीला आला राग, घरी जाताच लगावली कानशिलात; पण सकाळी चहा पिल्यानंतर जे झाले ते आठवून पती करतोय पश्चात्ताप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


वाराणसी - येथे एका महिलेने पतीचा राग आल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली. जीन्स आणि टॉप परिधान करून बाजारात फिरल्यामुळे पतीने पत्नीच्या कानाखाली लगावल्या होत्या. यानंतर पत्नीने रागाच्या भरात गळफास लावून आत्महत्या केली. खुशबू असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. महिलेच्या माहेरच्यांनी पतीवर पत्नीची हत्या करण्याचा आरोप लावला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. 

 

सामानाची खरेदी करून घरी परतला तर फासावर लटकताना दिसली पत्नी

पती चंदनने सांगितले की, 'खुशबू जीन्स आणि टॉप परिधान करून बाजारात गेली होती. तिच्या अशा या वागण्यामुळे ती तिला दोन चापटा मारल्या. तो म्हणाला की, मी तिला समजावले होते की सुसंस्कृत घरातील महिला जीन्स परिधान करत नाहीत. यानंतर तिच्या आईकडेही तिची तक्रार केली.' 


शुक्रवारी सकाळी साडे सात पर्यंत दोघांनी एकमेकांशी गप्पा मारल्या. नंतर खुशबूने चहा आणून दिला तसेच तिच्या आईशी बोलली. यानंतर मी काही सामान आणण्यासाठी खाली गेलो. सामान घेऊन वर गेलो तोपर्यंत खुशबूने गळफास लावून घेतला होता. मी तिला तत्काळ खाली उतरवले तेव्हा तिचा श्वास चालू होता. मी तिला रूग्णालयात दाखल केले. पण तिथे तिच्यावर उपचार सुरु होण्याअगोदर तिचा मृत्यू झाला. यानंतर तिच्या माहेरच्यांना घटनेची माहिती दिली. दरम्यान मुलीच्या माहेरच्यांनी पतीवर पत्नीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. 

 

पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर येईल सत्य

पोलिस सर्व बाबींवर तपास करत आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. रिपोर्ट आल्यानंतरच तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिस ठाणे अध्यक्ष शिव नारायण राम यांनी सांगितले. 
 

बातम्या आणखी आहेत...