आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात घुसलेल्या मगरीसोबत तरुणीने केले असे काही, सोशल मीडियावर शेअर केला त्या रात्रीचा किस्सा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्वालालंपूर - अनेकांना घरात पाल दिसल्यासही भीती वाटते. कित्येक लोक बाथरुममध्ये कॉकरोच पाहून ओरडत बाहेर निघतात. परंतु, एखाद्या घरात चक्क मगर घुसली असेल तर? मलेशियात राहणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणीसोबत असेच काही घडले. मलेशियातील केलांटन प्रांतात राहणाऱ्या नादियाच्या घरात एक मगर घुसली. सुरुवातीला पाहिल्यास मगरीने काहीच हालचाल केली नाही. तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला नाही. यानंतर नादियाने जे काही केले ते पाहून अख्खे हैराण आहे. तिनेच सोशल मीडियावर व्यक्त केलेला किस्सा आणि त्यावेळी घेतलेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


नादिया नावाची ही तरुणी केलांटन प्रांतातील कोटा भारू येथे राहते. हा भाग नद्या आणि कुरणांनी व्यापलेला आहे. तिच्या घराच्या मागच्या बाजूलाच एक मोठी नदी आहे. त्याच नदीतून एक मगर तिच्या घरातील अंगणात येऊन बसली होती. काही मिनिटे मगरीने हालचाल केली नाही. तसेच नादियावर हल्ला करणार अशी चिन्हेही नव्हती. यानंतर अचानक नादिया मगरीजवळ गेली आणि मगर उचलून घरात घेऊन आली. यानंतर चक्क मगरीला आपल्या मांडीवर बसवून हसतमुखाने सेल्फी काढल्या. संध्याकाळच्या वेळी घडलेल्या या घटनेचे तिने काही फोटो आणि व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर जारी केले. नादियाने सांगितल्याप्रमाणे, काही फोटो आणि सेल्फी काढल्यानंतर तिने मगर पुन्हा नदीच्या दिशेने सोडून दिली. तोपर्यंत तिचे फोटो जगभरात पसरले.

बातम्या आणखी आहेत...