आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसुती अगोदर ऑपरेशन थिएटरमध्ये गाण्यावर थिरकली गरोदर महिला, डॉक्टरांसोबत केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


लुधियाना : एका महिलेने डॉक्टरांसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही महिला चक्क प्रसुतीच्या ठीक आधी डान्स करत होती. सीझर करून महिलेची डिलिवरी  करण्यात येणार होती. पण याआधी तिने डॉक्टरांसोबत जबरदस्त डान्स केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून काही लोकांनी याचे कौतुक केले तर काही लोकांनी याबाबत प्रश्न देखील उपस्थित केले आहे. 

 

@hvgoenka या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करणाऱ्या हर्ष गोयनका यांनी लिहीले की, लुधियाना येते महिलेची सी-सेक्शन डिलिवरी करण्याच्या काही मिनिटांपू्र्वी डॉक्टर आणि रूग्णाने जबरदस्त नृत्य केले. 

 

Just a few minutes before the C-section delivery, the Doctor and the patient perform a nice jig. This happened in Ludhiana. pic.twitter.com/ZOlzIhbQ8c

— Harsh Goenka (@hvgoenka) December 28, 2018

डॉक्टर आणि महिला दिल धडकने दो चित्रपटातील गाण्यावर थिरकत आहे. त्यानंतर महिला बऱ्यापैकी रिलॅक्स होते आणि सर्जरीसाठी तयार झाली असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नृत्य करणारी संगीता शर्मा यांनी स्वतः ट्विटरवर येऊन लिहीले की, मी एक कोरियोग्राफर आहे आणि प्रेग्नंसीच्या काळातही अशाप्रकारचे नृत्य केले आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या कार्यावर संशय घेण्याची काही गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. 

 

 

Thanku so much sir 😊And Indeed my baby is super cute and a born dancer as well 😇 pic.twitter.com/0IWMumAbUh

— Sangeeta sharma (@sangeeta_onish) December 28, 2018

संगीताने दुसरे एक ट्वीट करून लिहीले की, माझी मुलगी खूप सुंदर असून तिने एका डान्सरच्या रूपात जन्म घेतला आहे. ती आता 8 महिन्यांची झाली आहे. तसेच कोणताही विचार न करता गरोदरपणात अशाप्रकारचे काम करू नये. पण कोणच्या निदर्शनाखाली डान्स केला तर हे गरोदरपणाच्या काळात एक उत्तम व्यायाम होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...