आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Dead Body: अंगावर पिवळी साडी, निळे ब्लाऊज; मक्याच्या शेतात मजुरांना सापडला महिलेचा मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जायखेडा (नाशिक) - बागलाण तालुक्यातील भडाणे येथे मक्याच्या शेतात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. भडाणे येथील शरद शांताराम भामरे यांच्या शेतात मजूर मक्याची कापणी करत होते. त्याचवेळी मजुरांना उग्र दुर्गध आला. वेळीच त्या दुर्गंधीचा शोध घेतला असता अंदाजे साठ सत्तर वर्षे वय असलेल्या महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडलेला आढळून आला. हा प्रकार पाहताच मजुरांची एकच भांबेरी उडाली. या बाबत शेत मालक व पाठोपाठ स्थानिक पोलिस पाटील महेंद्र सिताराम भामरे यांना कळविण्यात आले. 


पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच प्रथमदृष्ट्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. एखाद्या जंगली प्राण्याच्या हल्ल्यात सदर महिलेचा मृत्यू झाला, की तिच्यावर घात-पात करण्यात आला यासंदर्भात सविस्तर तपास केला जात आहे. याबाबत अधिक तपास जायखेडा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रमेश शेंडे, गोरख गर्दे करत आहेत. मृतक महिलेच्या अंगावर पिवळ्या रंगाची फुलांची नक्षी असलेली साडी, निळ्या रंगाचे ब्लाऊज, लाल रंगाचे स्वेटर आढळून आले आहे. या संदर्भात पोलिस स्थानिकांची सुद्धा चौकशी करत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...