आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहेरी जाणाऱ्या महिलेची हत्त्या, दागिने आणि पैशासहीत विवस्त्र अवस्थेत मिळाला मृतदेह...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मोतीपुर (बिहार)- कुटूंबातील वादानंतर सासरवरून माहेरी जाण्याऱ्या महिलेची गळा दाबून हत्त्या करण्यात आली. तिचा मृतदेह एका खड्यात विवस्त्र अवस्थेत अढळून आला. पोलिसांना महिलेसोबत गँगरेप झाल्याचा संशय आहे. पोलिस आधिक्षक कुमार अमिताभ यांनी सांगितले की, मृतदेहाजवळ एक पर्स, चप्पल आणि दागिने मिळाले आहेत. 

 

घरातील वादानंतर ती निघाली होती.

सासरच्या कुटूंबीयांसोबत तिचा वाद झाल्यानंतर ती 30 नोव्हेंबरला माहेरी जायला निघाली होती. कुटूंबीयांनी त्यांच्या स्तरावर शोधाशोध केली पण तिचा तपास नाही लागला. 2 डिसेंबरला तिच्या नवऱ्याने बरूराज पोलिसा ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, एका खड्यात विवस्त्र अवस्थेत महिलेचा मृतदेह मिळाला आहे. तिच्या गळ्याभोवती साडीचा फास लावण्यात आला होता. तिच्या अंगावरील दागिने तसेच ठेवले होते. मृतदेह मिळालेल्या जागेवर कारच्या टायरचे निशान मिळाले आहेत, त्यामुळे पोलिसांना संशय आहे की, गाडीतून सोडण्याच्या बहाण्याने महिलेला नेले असून तिच्यावर बलात्कार आणि हत्त्या केली असावी.

 

बातम्या आणखी आहेत...